Breaking News : लातुरात नाकाच्या शस्त्रक्रियेसाठी आलेला निघाला कोरोनाग्रस्त

हरी तुगावकर
शुक्रवार, 22 मे 2020

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत नाकाची शस्त्रक्रियेसाठी आलेला एक व्यक्ती कोरोना बाधित निघाला आहे. त्यामुळे लातूर शहरात पहिल्यांदाच कोरोनाने शिरकाव केला आहे.

लातूर : येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत नाकाची शस्त्रक्रियेसाठी आलेला एक व्यक्ती कोरोना बाधित निघाला आहे. त्यामुळे लातूर शहरात पहिल्यांदाच कोरोनाने शिरकाव केला आहे. यामुळे महापालिका हादरली असून याता हा व्यक्ती राहत असलेल्या भागातील परिसर प्रतिबंधित क्षेत्र करण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचाही शोध घेणे सुरु करण्यात आले आहे. आता जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ७३ झाली आहे. यातील दोघांचा मृत्यू झाला. ३५ जणांवर उपचार सुरु असून ३६ जण उपचार घेवून बरे झाले आहेत.

येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत गुरुवारी (ता.२१) जिल्ह्यातील एकूण ९५ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी या संस्थेतील २९ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यातील २७ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. एका व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे. पॉझिटीव्ह अहवाल आलेला व्यक्ती ६५ वर्षाचा आहे. तो नाकाच्या शस्त्रक्रीयेसाठी या रुग्णालयात दाखल झाला होता. शस्त्रक्रीया करण्यापूर्वी त्या व्यक्तीला होल्डिंग वार्डमध्ये ठेवून त्याचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. तो मागील आठ दिवसापूर्वी बिदर येथून आला असून सदर व्यक्ती लेबर कॉलनी येथील आहे. याची माहिती संस्थेच्या वतीने शुक्रवारी देण्यात आली आहे. त्यानंतर महापालिकेच्या वतीने आता लेबर कॉलनी परिसरात कोणकोणता भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून करता येईल याची पाहणी महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आली आहे. तसेच या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त सुंदर बोंदर यांनी `सकाळ`शी बोलताना दिली.

Breaking : लातूर जिल्ह्यात पाच नवे कोरोनाबाधित रुग्ण, पानगावमध्ये भीती

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत गुरुवारी (ता. २१) उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयातून एकूण ३६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले. त्यापैकी ३५ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. चाकूर येथून दोन व्यक्तींचे स्वॅब तपासीसाठी आले होते. त्यापैकी दोन्ही व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कासारशिरसी येथील ६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले असून त्यापैकी चार व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून दोन व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आले आहेत. मुरुड येथील सात व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच सात व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पोलिसांना माहिती देऊन मुलीनेच रोखला स्वतःचा बालविवाह, लातूरातील प्रकार

हमदपूर येथील नऊ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सहा व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून ३ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत.
येथील स्त्री रुग्णालयातील ६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच ६ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत, असे जिल्ह्यातील ९५ स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी ८७ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून दोन व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत व ६ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.

बिदरहून आठ दिवसांपूर्वी आलेला हा व्यक्ती आहे. तो बाहेर कोठेही गेला नाही अशी माहिती समोर येत आहे. तो नाकावर उपचार घेण्यासाठी शासकीय रुग्णालयात गेला होता. तेथे तो पॉझिटीव्ह आला आहे. त्याच्या घराचा शंभर मीटर परिसर सील करण्यात येत आहे. महापालिकेने सहायक आयुक्त सुंदर बोंदर यांची टास्क फोर्सचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. प्रत्येक घरी जाऊन थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार आहे. तसेच या भागातील एकही दुकान पुढील चौदा दिवस उघ़डले जाणार नाही. नागरीकांना घरपोच जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी यंत्रणा उभी केली जाणार आहे.
- विक्रांत गोजमगुंडे, महापौर, लातूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Positive Patient Found In Latur