राज्यमंत्री सत्तार यांना कोरोनाची लागण 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 July 2020

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा कोरोनाची लागण झाली आहे. ते रविवारी (ता.१९) मुंबईला गेले होते. आज त्यांनी आरोग्य तपासणी केली असता, ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा कोरोनाची लागण झाली आहे. ते रविवारी (ता.१९) मुंबईला गेले होते. आज त्यांनी आरोग्य तपासणी केली असता, ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने डॉक्टरांनी त्यांना दहा दिवस होम क्वारंटाइनचा सल्ला दिला असून, ते मुंबईला घरीच उपचार घेत आहेत.

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

घाबरण्याचे कारण नाही. सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच बरा होऊन परत आपल्या सेवेत तत्पर राहीन. संपर्कात आलेल्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन सत्तार यांनी केले असल्याची माहिती त्यांचे प्रसिद्धप्रमुख गजानन काकडे यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report positive of minister Abdul Sattar