कोरोना साईड इफेक्ट: शेतकऱ्यानेच घेतला हातात विळा 

फोटो
फोटो

नांदेड : अगोदरच शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाच्या विळख्यात अडकला असतानच पुन्हा त्याच्यावर कोरोना व अवेळी पावसामुळे मोठे संकट कोसळले आहे. यातून सावरण्यासाठी तो धडपड करत असला तरी शेतावर असलेला रब्बी हंगाम काढण्यासाठी मजुर मिळत नसल्याने चक्क एका शेतकऱ्याने स्वत:च आपल्या हाती विळा घेऊन गहु काढणीला सुरवात केली आहे.
 
मागील काही वर्षापासून शेतकरी कधी ओला दुष्काळ तर कधी अवर्षणामुळे आत्महत्येकडे वळला आहे. लहरी निसर्गाच्या प्रकोपामुळे जिल्ह्यातील शेतकरी वालदील झाला होता. त्यातच ऐन रब्बी हंगाम हाताशी येताच अवकाळीने पुन्हा डोळे वटारले. तर दुसरीकडे संबंध जगभर थैमान घातलेल्या कोरोनामुळे शेतात काम करण्यासाठी मजुर मिळेनात. 

शेतकरी स्वत: च मेहनत करत आहेत

शेतात हाता - तोंडाशी आलेला गहु अवकाळी पावसामुळे व बाऱ्यामुळे जमीनदोस्त होत आहे. तळहाताच्या फओडाप्रमाणे जपलेले पीक ऊभे डोळ्यासमोर नष्ट होत असल्याने शेतकरी पुर्णत : खचुन गेला आहे. शेतकरी प्रत्येक संकटावर मात करत आपला मार्ग व घरगाडा चालवित असतो. परंतु सध्या देशात सुरू असलेल्या लॉकडॉनमुळे त्याला शेतात आलेले धान्य आपल्या घरी नेण्यासाठी मजुर मिळत नसल्याने काही शेतकरी स्वत: च मेहनत करत आहेत.

चार दिवसापासून जवळपास दोन एकरमधील गहू कापणी 

बारड (ता. मुदखेड) शिवरात शेतकरी अंकुश भूजंगराव कोकाटे पाटील यांनी स्वत: च आपल्या हातात विळा घेऊन गहु कापणीस सुरवात केली आहे. याबाबत शेतकरी अंकुश कोकाटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जेवढे हातात आले तवढे तरी घरी घेऊन जावे लागले. जमावबंदी असल्याने एकत्र शेतकरी जमने शक्य नसल्याने होईल तेवढे काम दररोज करून मागील चार दिवसापासून जवळपास दोन एकरमधील गहू कापणी करत आहो. 

हळद, हरभरा व गहू पडून असल्याने नुकसान

कोरोनासारखे हे महाभंयकर संकट देशावर व जगावरील टळावे अशी प्रार्थना श्री. कोकाटे यांनी केली आहे.
तर दुसरे हळद उत्पादन करणारे शेतकरी राजू गंगाधर कोकाटे पाटील आणि संभा पाटील कोकाटे यांनीही आपला अनुभव कथन केला. हळद व शेतीतील इतर काम करण्यासाठी सध्या मजुर मिळत नसल्याने शेतातून काढलेली हळद, हरभरा व गहू पडून असल्याने नुकसान सहन करावे लागत आहे. तर दुसरीकडे अवकाळी पाऊसामुळे जास्तच नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com