esakal | Video- वाहनांवर दंडात्मक कारवाईसाठी एसपी विजयकुमार सरसावले
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी कडक पाऊले उचलले. त्यानुसार शहरात जागोजागी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.  अत्यावश्यक सेवेतील वाहनांची देखील सखोल चौकशी केल्यानंतरच त्या वाहनांना सोडण्यात येईल. 

Video- वाहनांवर दंडात्मक कारवाईसाठी एसपी विजयकुमार सरसावले

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जगात सध्या कोरोना या विषाणूविरुद्ध लढाई सुरू आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊन (संचारबंदी) दरम्यान शुक्रवारी (ता. २८) रात्री पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी कडक पाऊले उचलले. त्यानुसार शहरात जागोजागी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.  अत्यावश्यक सेवेतील वाहनांची देखील सखोल चौकशी केल्यानंतरच त्या वाहनांना सोडण्यात येईल.

शुक्रवारी दिवसाअखेर रात्री साडेआठच्या दरम्यान पोलीस अधिक्षक विजयकूमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी जुना कौठा भागातील पोलीस चौकी परिसरात आपल्या पथकासह पोहचले. यावेळी या रस्‍त्यावरुन नेहमीप्रमाणे जसी वर्दळ असावी तशी वाहनांची वर्दळ त्यांना दिसली. यावरुन त्यांनी सक्त पाऊल उचलत दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी सुरू केली.

हेही वाचा भाग एक : नांदेडमध्ये आहे नंदगिरी किल्ला, पण...काय? ते वाचाच

वाहनांवर दंडात्मक कारवाई

यात अनेक वाहने बिनकामाची फिरत होती. तर काही दुचाकी चालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. वाहतुक शाखेच्या मदतीने अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केल्यानंतरच ती वाहने सोडून देण्यात आली. पाहता- पाहता दिडशेहून अधीक वाहनांवर कारवाई करण्यात आली. सदर ठिकाणी दुचाकी, चारचाकी वाहने, चालक, पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी यांचा मोठा जमावचे चित्र दिसत होते.  

वरिष्ठ पोलिस अधिकारी रस्त्यावर

सर्व वाहन चालकांची नावे नोंदवून चावी परत करण्यात आल्या. आता प्रत्यक्षा आहे ती दंडाच्या रक्कमेची. यावेळी पोलीस अधिक्षक विजयकूमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी (इतवारा) धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे, संदीप शिवले, पोलीस उपनिरीक्षक गोविंद खैरे आदीसह इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

वाहनांवर दंडात्मक कारवाई

नियंत्रण कक्ष स्थापन, वाहतूक प्रमाणपत्राचे वितरण   

नांदेड : कोरोना विषाणुचा प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने वेळीच उपाययोजना केल्या आहेत. अत्यावश्यक सेवा व वस्तू यांची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनांना कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही. यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने ता. २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा क्रमांक ८४२१८०००९९ असा आहे.

येथे क्लिक करा - सावधान : नांदेडकरांनो पोलिसांचे ऐका, कायद्याच्या कचाट्यात सापडू नका- दत्ताराम राठोड

अत्यावश्यक वस्तुची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिमा तपासणी नाके देगलूर, बिलोली आणि सिमा तपासणी केंद्र भोकर यांच्याकडून वाहतूक प्रमाणपत्र दिले जात आहे. जिल्ह्यातील सर्व मालवाहूकदारांनी संबंधित ठिकाणी संपर्क साधावा. त्यांच्या वाहनातून अत्यावश्यक वस्तुची वाहतूक करणार असल्याबाबत पुरावा सादर करुन प्रत्येक वाहनासाठी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे.

mh26@mahatranscom.in या ई-मेलवर

संचारबंदीमुळे ज्या वाहनधारकांना परिवहन कार्यालयात येणे शक्य नाही त्यांनी कार्यालयाच्या mh26@mahatranscom.in या ई-मेलवर वाहन क्रमांक नमूद करुन अर्ज केल्यास त्यांना ई-मेलद्वारे प्रमाणपत्र दिले जाईल. याची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.


 

loading image