esakal | भटक्या बांधवांसाठी तरूणांनी मागितली भिक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

IMG-20200329-WA0018.jpg


जे लोक भिक्षा मागता आशा बांधवांसाठी जुन्या अर्धापूर शहरातील तरूणांनी घरोघरी जावून धान्य जमा केले. उपाशीपोटी जगणाऱ्या बांधवांना गहू तांदूळ, तेल, तिखट, मिठ, हाळद, साबण आदी जीवनावश्यक वस्तुंचे शनिवारी (ता.२८) वाटप करण्यात आले. 

भटक्या बांधवांसाठी तरूणांनी मागितली भिक्षा

sakal_logo
By
लक्ष्मिकांत मुळे


अर्धापूर, (जि.नांदेड) ः पोटासाठी भटकंती करून उदरनिर्वाह करणाऱ्यांचे संचार बंदीने खूप मोठे हाल होत आहेत. खायला अन्न नाही, बाहेर भिक्षा मागता येईना, हाताला काम नाही अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. जे लोक भिक्षा मागता आशा बांधवांसाठी जुन्या अर्धापूर शहरातील तरूणांनी घरोघरी जावून धान्य जमा केले. उपाशीपोटी जगणाऱ्या बांधवांना गहू तांदूळ, तेल, तिखट, मिठ, हाळद, साबण आदी जीवनावश्यक वस्तुंचे शनिवारी (ता.२८) वाटप करण्यात आले. शहरातील विविध भागात राहणाऱ्या सुमारे ५५ कुटुंबाला धान्य वाटप करण्यात आले. या मदतीने हातावर पोट असणाऱ्या या बांधवांना खुप मोठा आधार मिळाला. 

सर्व व्यवहार ठप्प
अर्धापूर शहरात अर्धापूर-नांदेड रस्त्याच्या बाजूला मोकळ्या जागेत विविध प्रांतातील व हिंगोली, विदर्भ आदी भागातील  भटकंती करून उदरनिर्वाह करणारे मजुर पालामध्ये थांबले आहेत. यात मुर्तीकार, फोटो, काचेचे मंदिर विकणारे, भिक्षा मागणारे यांचा समावेश आहे. कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

फेरीवाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद
या पालामध्ये राहणाऱ्या बांधवांसाठी पुण्यजागर प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक लक्ष्मीकांत मुळे, गजानन मेटकर, गुणवंत विरकर, नाना डक, शिवराज भुसारे यांनी जुन्या अर्धापूर शहरातील वाडीकर गल्ली, रामनगर, गवळीगल्ली, ब्राह्मण गल्ली, केशव राजनगर आदी भागात जाऊन धान्य जाम केले. या मदत फेरीवाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. 

हेही वाचा -  लॉकडाऊनचा माफीयांनी असाही घेतला फायदा
भटक्यांच्या पावलावर जाऊन जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. या वेळी पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे, आरोग्य अधिकारी मदन डाके, सुहास गायकवाड, रामलींग महाजन आदी उपस्थित होते. या मदत फेरीत सुरेश डक, आकाश गव्हाने, शिवाजी पवार, बलवीर देशमुख, नवनाथ राऊत, लक्ष्मण गाढवे यांनी सहभाग नोंदविला.