उस्मानाबाद : हाय रिस्क काॅन्टॅक्टमधील सात जण निगेटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मे 2020

तीन पैकी एका रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्या रुग्णाला सोलापूरला हलविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यानी दिली आहे.

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील तीन लोकांना कोरोनाची लागन झाल्याने त्यांच्या अत्यंत जवळ संपर्कातील सात लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजूनही त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या स्वॅब चाचणीचे अहवाल येणे बाकी आहे. तीन पैकी एका रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्या रुग्णाला सोलापूरला हलविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यानी दिली आहे. पण, यातील दिलासा देणारी बाब म्हणजे त्या व्यक्तीच्या पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

कोरोना विषाणूचे सध्या जिल्ह्यामध्ये चार रुग्ण सापडले आहेत. त्यातील तीन रुग्ण गुरुवारी एकाच दिवशी सापडले आहेत. 38 दिवसानंतर जिल्ह्यात रुग्णांची संख्या चारवर गेल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्याच्या स्थितीला गुरुवारपर्यंत दोन हजार 861 इतक्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यातील 973 लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन केले असून, राहिलेल्या एक हजार 888 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यातील 269 लोकांना डिस्चार्ज देण्यात आले आहेत. 633 लोकांचे स्वॅब चाचणी घेण्यात आली असून 32 लोकांचे अहवाल येणे बाकी आहे. 

नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही... 

या अगोदर दोन व तीन एप्रिल रोजी उमरगा तालुक्यातील तीन रुग्ण कोरोनाने बाधित झाले होते, त्याना उपचारानंतर सोडुन देण्यात आले होते. त्यानंतर तब्बल 38 दिवसापर्यंत जिल्ह्यात सुदैवाने एकही रुग्ण आढळलेला नव्हता. आता मात्र परंडा तालुक्यातील एक तर कळंब तालुक्यातील तीन रुग्ण पॉझीटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यातील कळंब तालुक्यातील एकाची प्रकृती अधिक गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी पुढील उपचाराकरीता त्या रुग्णाला सोलापुरला हलविण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कातील आलेल्या लोकांची माहिती घेण्याचे काम सूरु आहे.

 मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताय? गूगलच्या या सेटिंग्ज माहिती हव्याच! 

पहिल्या टप्प्यात अत्यंत जवळच्या संपर्कातील आठ लोकांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील सात लोकांचे अहवाल आज प्राप्त झाले असुन ते सातही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अजुनही अनेक लोकांचे स्वॅब घेण्यात आले असुन ते शनिवारी रात्री प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. गलांडे यानी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Test Reports Negative Osmanabad News