मोकाट फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी; जिंतूर पोलिस व नगरपालिकेची कारवाई

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. यात अत्यावश्यक सेवा वगळता किराणा व भाजीपाला यांना सकाळी सात ते ११ आणि कृषी विषयक दुकानाना दुपारी दोन वाजेपर्यंत सूट देण्यात आली.
जिंतूर टेस्टींग
जिंतूर टेस्टींग

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : प्रशासनाने ठरवून दिलेल्या अकराच्या वेळेनंतरही (Jintur police and nagarparishad) रस्त्यावर मोटार फिरणाऱ्या नागरिकांची पोलिस व नगरपरिषदेतर्फे मंगळवारी (ता. १८) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. तसेच वेळ संपल्यावरही दुकाने सुरु ठेवणाऱ्या व विनामास्क फिरणाऱ्या (no mask, testin corona) नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. (Corona testing of moccasins; Jintur police and municipal action)

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. यात अत्यावश्यक सेवा वगळता किराणा व भाजीपाला यांना सकाळी सात ते ११ आणि कृषी विषयक दुकानाना दुपारी दोन वाजेपर्यंत सूट देण्यात आली.

हेही वाचा - मराठा समाजाची आरक्षणासाठी पुन्हा मोर्चेबांधणी

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्क वापरावा असे आवाहन प्रशासन वेळो वेळी करत आहे. तरीपण नागरिक विनाकारण बाहेर पडत आहेत. म्हणून नगरपरिषद व पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची जागेवरच कोरोना चाचणी केली. यावेळी जवळपास ७० नागरिकांची चाचणी करण्यात आली. शिवाय नगरपरिषदेने वेळेनंतर सुरु असलेली दुकाने व विनामास्क फिरणाऱ्याकडून चौदा हजार पाचशे रुपये दंड वसूल केला आहे.

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रवण दत्त, परिविक्षाधीन पोलिस उपविभागीय अधिकारी बापूराव दडस, पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, शरद जऱ्हाड, फौजदार लोखंडे, चौरे, संगीता वाघमारे, अरविंद धबडे, उमेश चव्हाण, गजानन क्षिरसागर, महादेव गोरे, संतोष पैठणे व नगरपरिषदचे उप मुख्याधिकारी चाळके, सालेह चाऊस, सिताराम कसबे, चव्हाण, जगताप, शेख ताहेर आदी कार्यवाही करत होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com