esakal | Corona Vaccination: लसीकरणात बीड तिसऱ्या स्थानी; हिंगोली, धुळेची सर्वोत्तम कामगिरी
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine

शनिवारी पाचशे लोकांना लस टोचण्याचे उद्दिष्ट असताना ५५४ लोकांना लस देण्यात आली आहे

Corona Vaccination: लसीकरणात बीड तिसऱ्या स्थानी; हिंगोली, धुळेची सर्वोत्तम कामगिरी

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड: केंद्र सरकारच्या सुचनेनंतर जिल्ह्यात पाच केंद्रांवर शनिवारी (ता. २३) कोरोनाविरुद्धच्या कोव्हिशिल्ड लसीकरणाचे पाचवे सत्र पार पडले. पुन्हा एकदा बीडचा लस टोचण्याचा टक्का मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक राहिला आहे.

शनिवारी पाचशे लोकांना लस टोचण्याचे उद्दिष्ट असताना ५५४ लोकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंतच्या पाच सत्रांतील लसीकरणात आणि शनिवारच्या लसीकरणातही बीड जिल्हा महाराष्ट्रात तिसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंतच्या लसीकरणात हिंगोली पहिल्या तर धुळे दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, शनिवारच्या ललसीकरणात जालना आणि गडचिरोली बीडच्या पुढे आहे. शनिवारच्या लसीकरणात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत बीडचे लसीकरण अधिक आहे.

'वीस वर्षांपासून रखडलेल्या साठवण तलावाचे काम मार्गी लागणार'

सिरम इन्स्टीट्यूटनिर्मित कोव्हिशिल्ड कोरोना प्रतिबंधक लसीचे १७ हजार ६४० डोस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. तर, पहिल्या टप्प्यात १४ हजार ६०९ लोकांना लस टोचण्यासाठी नावनोंदणी झालेली आहे. दरम्यान, मागच्या शनिवार (ता. १६) पासून जिल्ह्यातील अंबाजोगाईचे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, परळीचे उपजिल्हा रुग्णालय, गेवराईचे उपजिल्हा रुग्णालय व आष्टीचे ग्रामीण रुग्णालय या पाच केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे.

आतापर्यंत लसीकरणाचे पाच सत्र पूर्ण झाले आहेत. आरोग्य विभागातील डॉक्टर्स, व कर्मचाऱ्यांमध्ये कुठलीही भीती नसल्याने त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला लसीकरणासाठीच्या कोव्हिन या सॉफ्टवेअरमधील दोषांमुळे अपेक्षीत लसीकरण झाले नाही. तरीही शनिवार व शुक्रवारच्या सत्रात उद्दीष्टापेक्षा अधिक लसीकरण करुन बीडच्या आरोग्य विभागाने राज्यातील अव्वल जिल्ह्यांत स्थान पटकावले आहे.

' काँग्रेस जळकोट नगरपंचायत निवडणूक स्वबळावर लढणार '

राज्यात बीड तिसऱ्या स्थानी-
दरम्यान, रोज पाच या प्रमाणे आतापर्यंत एकूण लसीकरणाचे २५ सत्र करण्याचे ठरवून दिलेले उद्दीष्ट बीडच्या आरोग्य विभागाने पूर्ण केले आहे. रोज ५०० प्रमाणे आतापर्यंत २५०० लोकांना लस टोचायला हवी होती. मात्र, सॉफ्टवेअरमधील दोषांमुळे दोन दिवस संख्या घटल्याने आतापर्यंत २२६२ लोकांना लस टोचून राज्यातील ३६ जिल्ह्यांत बीड तिसऱ्या स्थानी आहे. मराठवाड्यातील हिंगोली जिल्हा पहिल्या स्थानी आहे. वास्तविक या जिल्ह्याला सत्रांची आणि लाभार्थींचे उद्दिष्ट खुप कमी आहे. दुसऱ्या स्थानावर धुळे जिल्हा आहे

(edited by- pramod sarawale)

loading image