दवंडी लावून बीडमध्ये वाटले फुकट चिकन 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 March 2020

कोरोना व्हायरसच्या अफवेने पोल्ट्री व्यवसाय पुरता अडचणीत आला आहे. या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने भरपाई देण्याची मागणी करीत व्यावसायिकांनी बुधवारी (ता. ११) दवंडी देऊन मोफत चिकन वाटप केले. यावेळी मोर्चाही काढण्यात आला. 

बीड : कोरोना व्हायरसच्या अफवेने पोल्ट्री व्यवसाय पुरता अडचणीत आला आहे. या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने भरपाई देण्याची मागणी करीत व्यावसायिकांनी बुधवारी (ता. ११) दवंडी देऊन मोफत चिकन वाटप केले. यावेळी मोर्चाही काढण्यात आला. 

कोरोना आणि चिकनचा काहीही संबंध नसताना अफवेमुळे चिकन विक्रीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात कोंबड्यांचा भाव कमालीचा घसरून ८० रुपयांवरून २० रुपयांवर खाली आला आहे. कुक्कुटपालन व्यावसायिकांना शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. याच वेळी कोरोना आणि चिकन यांचा संबंध असल्याची अफवा असल्याचे सिद्ध करण्यासाठी दवंडी देऊन चिकन वाटप करण्यात आले. लोकांनीही आवडीने चिकन खाल्ले. 

लातूरला कधी होणार चिकन महोत्सव

आंदोलनात गणेश राऊत, अजीज कुरेशी, तुकाराम सालगुडे, सोनू मस्के, शेख निसार, दिलावर खान, सूरज साळवे, नीलेश मस्के, हारुण पठाण, शिवाजी साखरे, विजय मुळे, अक्षय मस्के, वाल्मीक सिंघन, रविदास साल्गुडे, दीपक मस्के, राहुल गमे, अनिल शिंदे, मिलिंद साबळे, नीलेश जगताप, हनुमंत जगताप, राहुल वामने, विष्णू लहाने, सचिन जगताप, नितीन जगताप आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Virus Effect On Poultry Farms Business Beed News