कुपोषणमुक्ती पॅटर्नवरही पडली कोरोनाची वक्रदृष्टी- कुठे ते वाचा 

नवनाथ येवले
बुधवार, 18 मार्च 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाभरातील आंगणवाडी केंद्र बंदचे आदेश लागू करण्यात नांदेड पॅटर्नही पुढील आदेशापर्यंत स्थिगित करण्यात आला आहे.

नांदेड : नांदेडचा कुपोषणमुक्ती पॅटर्न दुर्गा बाळ गणेश महोत्सवाची राज्य शासनाने दखल घेऊन महिला दिनानिमित्त यशोदा माता अंगत - पंगत अभियानाच्या स्वरूपात राज्यभरात लागू केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाभरातील आंगणवाडी केंद्र बंदचे आदेश लागू करण्यात नांदेड पॅटर्नही पुढील आदेशापर्यंत स्थिगित करण्यात आला आहे.
 

राज्याला कुपोषणमुक्तीसाठी दिशादर्शक ठरलेला दुर्गा बाळ गणेश महोत्सवात गर्भवती महिलांचा सहभाग वाढत आहे. आंगणवाडी स्तरावर घरचा डबा घेऊन गर्भवती महिलांची अंगत- पंगतीने पोटभर जेवण होते. त्यानंतर महिलांना आंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या समक्ष आयर्न, फोलिक ॲसिडच्या गोळ्यांचे सेवन करावे लागते.

 गरोदरपणामध्ये अपचनाची समस्या मिटून गर्भवती महिलांचे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे गरोदर माता मृत्यू व बालमृत्यू दर शुन्यावर येऊन ठेपला असून सुदृढ बालकांच्या जन्माचे प्रमाण वाढले आहे. प्रायोगिक तत्वावर जिल्ह्यातील २७० अंगणवाडी केंद्रांच्या कार्यक्षेत्रामध्ये पहिल्या टप्प्यात दोन हजारांवर गर्भवती महिलांनी दुर्गा बाळ गणेश महोत्सवात सहभाग घेतला होता. 

हेही वाचा - ‘झेडपी’च्या शाळेत घडणार खगोलशास्त्र अभ्यासक, कुठे ते वाचा?

सुदृढ बालाकांचा जन्मदर वाढला
अवघ्या महिनाभरात महोत्सवाचे सकारात्मक परिणाम दिसून आल्याने लोकाग्रहास्तव हा महोत्सव वर्षभरासाठी राबविण्यात आला होता. कुपोषणमुक्तीसाठी राज्याला दिशादर्शक ठरणारा दुर्गा बाळ गणेश महोत्सव आता राज्यभरात यशोदा माता अंगत- पंगत अभियान या स्वरूपात राज्यभरात राबविण्यात येत आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये आंगणवाडी केंद्र बंदचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे नांदेड पॅटर्नही पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आला आहे. 

आंगणवाडीकडे चिमुकलेही फिरकेनात 
आंणवाडी केंद्रांचे कामकाज बंद करण्यात आल्याने मदतनीस, सेविका यांना कोरोनाचे संकट पिटाळून लावण्यासाठी गावपातळीवर दक्षतेच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांच्या समवेत गावातील संशयित रुग्णांवर नजर ठेवून नागरिकांमध्ये खबरदारीची जागृती करण्यात येत आहे. खाऊ वाटप होत नसल्याने चिमुकलेही फिरकत नसल्याने एरवी बोबड्या बोलीचा आंगणवाडीतील किलबिलाट कोरोनामुळे तुर्तास शांत झाला आहे.

येथे क्लिक करा -  कोरोना व्हायरस : रक्तदात्यांमध्ये भितीचे वातावरण

पुढील आदेशापर्यंत स्थगित 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून जिल्ह्यातील आंगणवाडी केंद्र, मिनी आंगणवाडी बंद करण्यात आल्या आहेत. आंगणवाडी केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये आंगणवाडी कर्मचारी महिलांनी दक्ष राहून कोरोनाचे संकट पिटाळून लावण्यासाठी जागृती करावयाची आहे. पुढील आदेशापर्यंत दुर्गा बाळ महोत्सव स्थगित करण्यात आला आहे.
एस. व्ही. शिंगणे ( उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण) 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona's obsession with malnutrition also falls - read wherever,Nanded News