esakal | बापरे...! एवढ्या लोकांची घरवापसी...
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

आतापर्यंत ग्रामीण भागात 925 गावात तब्बल 54 हजार 183 लोक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंध अंतर्गत आशा स्वंयसेविका या खऱ्या अर्थाने कोरोना वॉरियर्स ठरत असून त्यांच्या माध्यमातून घरोघरी जात आतापर्यंत दोन लाख 56 हजार कुटूंबाचे सर्वेक्षण पूर्ण

बापरे...! एवढ्या लोकांची घरवापसी...

sakal_logo
By
कैलास चव्हाण

परभणी : मुळ जिल्ह्याचे रहिवासी असणारे आणि कामानिमीत्त देशाच्या विविध भागात राहणारे भुमीपुत्र परतण्याचा वेग कमी होताना दिसुन येत नाही. आतापर्यंत ग्रामीण भागात 925 गावात तब्बल 54 हजार 183 लोक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंध अंतर्गत आशा स्वंयसेविका या खऱ्या अर्थाने कोरोना वॉरियर्स ठरत असून त्यांच्या माध्यमातून घरोघरी जात आतापर्यंत दोन लाख 56 हजार कुटूंबाचे सर्वेक्षण पूर्ण केले असून जनतेच्या आरोग्याची इत्यंभुत माहीती समोर आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या आशा स्यंवसेविका यांची मोठी मदत होत आहे. घरोघरी जात कुटटूंबाचे सर्वेक्षण करण्याची जबाददारी आशा पार पाडत आहेत. अत्यंत तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या आशा स्वंयसेविका कोरोना लढ्यात महत्वपूर्ण योगदान देत आहेत. जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर व मुख्य कार्यकारी अधिकारी
पृथ्वीराज बी. पी. यांच्या मार्गदर्शनाखाली यापुर्वी पहिल्या टप्यात ता. 18 मार्च ते ता. नऊ एप्रील  दरम्यान जिल्ह्यात 31 प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या दोन लाख 41 हजार 367 कुटूंबाना आशा स्वयंसेविकांनी भेटी दिल्या आहेत. 

येथे क्लिक करा समाजसेवा : गावाची उन्हाळ्यात भागवली तहान

एक लाख 67 हजार 538 सदस्यांचे सर्वेक्षण

त्यानंतर सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा देखील पूर्ण होत आला आहे. गंगाखेड तालुक्यातील 29 हजार 186 कुटूंबातील एक लाख 67 हजार 538 सदस्यांचे सर्वेक्षण काम पूर्ण झाले आहे. जिंतुरमध्ये 51 हजार 905 कुटूंबातील दोन लाख 37 हजार 323 सदस्य, मानवत तालुक्यातील आठ हजार 271 कुटूंबातील 38 हजार नऊ, पालम तालुका 22 हजार 987 कुटूंबातील एक लाख आठ हजार 595, परभणी तालुक्यातील 50 हजार 166 कुटूंबातील दोन लाख 51 हजार 653, पाथरी तालुक्यातील 24 हजार 847 कुटूंबातील एक लाख 26 हजार 606, पूर्णा तालुक्यातील 27 हजार 94 कुटूंबातील एक लाख 43 हजार 606, सेलु तालुक्यातील 20 हजार 758 कुटंबातील एक लाख 12 हजार 115, सोनपेठ तालुक्यातील 10 हजार 614 कुटूंबातील 36 हजार 30 सदस्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

14 हजार लोकांना रक्तदाब

सर्वेक्षण दरम्याण नागरीकांच्या आजारांची माहीती मिळत आहे.आतापर्यंत उपलब्ध माहीती नुसार जिल्ह्यातील 14 हजार 1118 लोकांना रक्तदाबाचा त्रास आहे.10 हजार 376 लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत.तर 5 हजार 246 लोकांना दमा आहे. तर एक हजार 501 लोक गंभीर आजाराने ग्रस्त आहेत.

तालुका -  बाहेर आलेली संख्या
गंगाखेड  -  13,574
जिंतुर   -  7,622
मानवत- 2,140
पालम- 3,050
परभणी- 4,809
पाथरी- 9,018
पूर्णा- 4,571
सेलु- 8,962
सोनपेठ- 437
एकुण- 54,183

हेही वाचा - रोहित्र दुरुस्ती वेळेत पूर्ण करा....कोणी दिले आदेश ते वाचा

42 हजारावर कॉरन्टाईन

जिल्ह्यात बाहेरुन आलेल्यापैकी 42 हजार 364 लोकांना कॉरंनटाईन करण्यात आले आहे. त्यामध्ये गंगाखेड तालुक्यातील आठ हजार 915, जिंतुर तालुक्यातील सात हजार 259, मानवत तालुक्यातील एक हजार 86, पालम तालुक्यातील दोन हजार 752, परभणीतील तिन हजार 980, पाथरीतील चार हजार 586, पूर्णेतील चार हजार 393, सेलूमधील आठ हजार 962, सोनपेठमधील 431 लोकांना कॉरंनटाईन केले आहे.