समाजसेवा : गावाची उन्हाळ्यात भागवली तहान

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 27 May 2020

लाखो रुपये खर्च करून बोरगाव (आ) येथे गल्लोगल्ली दोन हजार फूट पाइपलाइन करून घरोघरी नळाच्या तुट्ट्या वॉल सहीत दिले. या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

नांदेड : समाजसेवेचा छंद असणाऱ्या पुंडलिक हरीजी पाटील व जयश्री पाटील यांनी भर उन्हाळ्यात बोरगाव आ. (ता. लोहा) येथील नागरिकांची भागवली तहान. लाखो रुपये खर्च करून बोरगाव (आ) येथे गल्लोगल्ली दोन हजार फूट पाइपलाइन करून घरोघरी नळाच्या तुट्ट्या वॉल सहीत दिले. या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

बोरगाव येथील शेतकरी तथा प्रतिष्ठित नागरिक पुंडलिक हरीजी पाटील व जयश्री पाटील यांनी जवळपास अडीच हजार लोकसंख्या असलेल्या बोरगाव (आ) येथे बोरगाव तांडा वस्ती, बोरगाव येथील दलित वस्ती व सर्वसामान्यांच्या वस्तीमध्ये भर उन्हाळ्यात गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासत पिण्याच्या पाण्याची उत्कृष्ट व्यवस्था त्यांनी करून दिली.

हेही वाचा नांदेडकरांना आता मिळणार तीन दिवसांआड पाणी

समाजसेवेचा वसा टाकणार नाही

याबाबत पुंडलिक पाटील यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की, गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. काही नागरिकांकडे वयक्तीक बोर आहेत. परंतु सध्या कोरोणाचा प्रार्दुभाव राज्यात व जिल्ह्यात वाढल्यामुळे कुणी कुणाच्या घरी पाण्याला जात नाही. गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गोरगरीब नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तेव्हा आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. मला लहानपणापासून समाजसेवा करण्याची आवड आहे. तीन मुले सरकारी नोकरीला आहेत. यात दोघेजण पोलिस फौजदार असून चांगल्या दर्जाची शेती आहे. गोदावरी नदीतील पाणी बोरगाव येथील माझ्या शेतातील विहिरीमध्ये सोडले आहे. 

गावातील सर्वाना मोफत घरपोच पाणी

आता गावात तांड्यावर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे आपल्या शेतीतील कारल्याची बाग, फळ झाडांची बाग, जनावरांचा चारा व इत्यादी पीक बाजूला सारुन शेतात पीक न घेता गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून दोन लाख रुपये खर्च करून बोरगाव येथे गल्लोगल्ली पाइपलाईन करून घर तेथे नळ दिला आहे. यात कोणताही भेदभाव न करता सर्व समाज बांधवांना नळ व पाणी उपलब्ध करून दिले आहे. यात तांडा  वस्ती, दलित वस्ती व नविन वस्ती सर्वांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. सर्वांना पाणी मिळत असून पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे समाधान वाटत आहे. तसेच सदर योजनेला कै. साहेबराव हारजी पाटील पिण्याचे पाणी मोफत नळ योजना बोरगाव असे नामकरण केल्याचे पुंडलीक पाटील म्हणाले.

येथे क्लिक करा -  रोहित्र दुरुस्ती वेळेत पूर्ण करा....कोणी दिले आदेश ते वाचा

गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले

यावेळी गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया महिला- पुरुष, तांडा वस्ती, दलित वस्ती येथील अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता त्या सर्वांनी पुंडलिक पाटील व जयश्री पाटील यांच्या कामाचे कौतुक करुन आभार व्यक्त केले. भर उन्हाळ्यात आपल्या शेतात पीक न घेता आम्हा सर्वांना पाणी उपलब्ध करून दिले. त्यामुळे येथील नागरिक समाधानी असल्याचे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social service: The village quenched its thirst in summer nanded news