esakal | उदगीरात दोन पानटपरी चालकांना पोलिसांचा दणका, गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

CoronaVirus News latur

शहरातील शिवाजी चौकात शनिवारी (ता.21) कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेसंदर्भात जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी शुक्रवारी (ता.20) पानटपरी चालकांना पानटपरी बंद करण्याचे आदेश दिले असताना या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदगीरात दोन पानटपरी चालकांना पोलिसांचा दणका, गुन्हा दाखल

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर : शहरातील शिवाजी चौकात शनिवारी (ता.21) कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेसंदर्भात जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी शुक्रवारी (ता.20) पानटपरी चालकांना पानटपरी बंद करण्याचे आदेश दिले असताना या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- इकडे आईचं सरण पेटलं आणि तिकडे...

याबाबत शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की देशभर कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू आहे. या परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश काढून जिल्ह्यातील सर्व पानटपरी बंद करण्याचे कळवले होते. मात्र शिवाजी चौकात मोसिन जाफर बागवान (वय-40) व अक्षय पन्नालाल जैन (वय-24) (रा. उदगीर) यांनी पानटपरी सुरू ठेवली होती.

यावेळी शहर पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांचे गस्तीवर असलेल्या संयुक्त पथकाने भेट दिली असता ही पानटपरी चालू असल्याचे आढळून आले. नगरपालिकेचे नोडल अधिकारी ज्ञानेश्वर काळे (वय-21) यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात साथरोग नियंत्रण कायद्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 हे वाचलंत का?- भाजपचे नगरसेवक आले काळे कपडे घालून आणि... 

loading image