कोरोना : दुबईहून परतलेल्या बीडच्या ‘त्या’ तिघांचेही वैद्यकीय अहवाल... 

दत्ता देशमुख, बीड
Saturday, 14 March 2020

बीड शहरातील एक कुटूंब दुबईला पर्यटनासाठी गेले होते. ता. एक मार्चला ते देशात परतले. दुबईहून आलेल्या पुण्यातील तिघांना आणि त्यांच्या चालकासह मुलीला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले. या कुटूंबासोबतच या बीडच्या तिघांनीही प्रवास केला होता

बीड : पुण्यातील संशयीत कोरोनाग्रस्त रुग्णांच्या विमानात दुबईहून भारतात प्रवास केलेल्या तिघांच्या कोरोना व्हायरस बाबतचा वैद्यकीय अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली. शनिवारी (ता. १३) सकाळी हा अहवाल प्राप्त झाला.

बीड शहरातील एक कुटूंब दुबईला पर्यटनासाठी गेले होते. ता. एक मार्चला ते देशात परतले. दुबईहून आलेल्या पुण्यातील तिघांना आणि त्यांच्या चालकासह मुलीला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले. या कुटूंबासोबतच या बीडच्या तिघांनीही प्रवास केला होता. 

इकडे आईचं सरण पेटलं आणि तिकडे...

राज्याच्या आरोग्य विभागाने त्यांची नावे जाहिर करीत बीडच्या आरोग्य विभागाला सतर्कतेच्या सुचना केल्या. त्या तिघांच्याही कोरोनाबाबतच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. याचा अहवाल आता आरोग्य विभागाल प्राप्त झाला असून तिघांचेही अहवाल निगेटिव्ह असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सांगितले. 

नागरिकांनी कोरोना आजाराबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये. सर्वांनी स्वता:ची काळजी घ्यावी. घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Patient In Beed Health News