धोक्याची घंटा... उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव...

सयाजी शेळके
शुक्रवार, 15 मे 2020

 जिल्ह्यात गेल्या ३७ दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता, त्यामुळे सर्व दुकाने सुरु करण्याचा आदेश काढण्यात आले होते. पंरतू, सोमवारी परंडा शहरात एक रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी परंडा तालुक्यासाठी नवा आदेश काढला

उस्मानाबाद  : जिल्ह्यातील कळंब तालुक्यात एका दिवशी तीन रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने १७ मे पर्यंत तालुक्यातील सर्व स्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत.

गेल्या ३७ दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. कळंब तालुक्यात एका दिवशी ३ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 
दरम्यान, कळंब तालुक्यात प्रतिबंधक उपायोजना म्हणून शहर आणि तालुक्यात काही अत्यवश्यक सेवा आणि जीवनावश्यक दुकाने वगळता अन्य सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी काढले आहेत. जिल्ह्यात गेल्या ३७ दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता,

जाणून घ्या -  नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही... 

त्यामुळे सर्व दुकाने सुरु करण्याचा आदेश काढण्यात आले होते. पंरतू, सोमवारी परंडा शहरात एक रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी परंडा तालुक्यासाठी नवा आदेश काढला. त्यानंतर आता कळंब तालुक्यात तीन रुग्ण आढळून आल्यानंतर कळंब शहर आणि तालुक्यात काही अत्यवश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने वगळता अन्य सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहे.

हेही वाचा - औरंगाबादेत१८ महिण्यांच्या बाळाला कोरोना  

हे राहाणार सुरु  
- शासकीय - निमशासकीय कार्यालय, पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना, सर्व बँका, दूरध्वनी, इंटरनेट पुरवठा करणाऱ्या आस्थापना, 
- अन्न, भाजीपाला, दूध, किराणा मालाची दुकाने (सकाळी ८ ते दुपारी २ )
- दवाखाने, वैयकिय केंद्र, औषधी  दुकाने , विद्युत पुरवठा, ऑईल, पेट्रोल पंप, प्रसार माध्यमे, मीडिया 
अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व आस्थापना.

हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान   

काय राहणार बंद  
वरील आस्थापना व दुकाने वगळून कळंब शहर आणि तालुक्यातील सर्व जनरल स्टोअर्स, वेल्डिंग दुकाने, कपड्याची दुकाने आदी आस्थापना बंद राहणार आहेत.  
-----

Coronavirus Updates Danger Warning for Osmanabad District


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Updates Danger Warning for Osmanabad District