ओवेसी घेणार नगरसेवकांची ‘शाळा’

asaduddin-owaisi
asaduddin-owaisi

औरंगाबाद - पक्षशिस्तीच्या बाहेर जाऊन नगरसेवक वर्तन करीत असल्याने ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमिन पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी चांगलेच संतापले आहेत. त्यांनी राज्यातील सर्व नगरसेवक, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील ११२ सदस्यांना हैदाराबादेत पाचारण केले आहे. येत्या चार आणि पाच सप्टेंबर रोजी ओवेसी या सर्वांची शाळा घेणार असून, त्यात पक्षशिस्त, सभागृहात बोलणे, वर्तणुकीचे धडे दिले जातील. 

औरंगाबादेतील नगरसेवक सय्यद मतीन यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेला विरोध केला होता. सभागृहात झालेली मारहाण, स्थानबद्धतेच्या कारवाईने पक्ष अडचणीत आला. ओवेसी यांची ‘मैने मतीन को पच्चीस मर्तबा समझा के बोला फिर भी वो नहीं माना’ ही ऑडिओ क्‍लिपसुद्धा व्हायरल झाली होती. नगरसेवकांच्या वर्तनामुळे पक्ष अडचणीत येत असल्याने या सर्वांना आता हैदराबादेत पाचारण करण्यात आले आहे. सर्व नगरसेवकांना तेलंगणमधील; तसेच महाराष्ट्रातील आमदार इम्तियाज जलील, वारिस पठाण मार्गदर्शन करतील. एमआयएमची सर्वाधिक शक्ती औरंगाबादेत आहे. त्यांचा एक आमदार, तर २४ नगरसेवक असून, महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com