Beed : घाटसावळीत कापूस पिकावर शेतीशाळा

पुणे येथील पीआययूचे नरेंद्र पाटील व धम्मशिला भडीकर यांनी घाटसावळी येथील कापूस पिकावर आधारित शेती शाळेस भेट दिली.
beed
beed sakal

बीड : कृषी विभागाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट कॉटन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पाच्या अनुषंगाने कृषी आयुक्तालय, पुणे येथील पीआययूचे नरेंद्र पाटील व धम्मशिला भडीकर यांनी घाटसावळी येथील कापूस पिकावर आधारित शेती शाळेस भेट दिली.

स्मार्ट कॉटन अंतर्गत मैदा पोखरी व घाटसावळी, बकरवाडी या गावांमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, प्रकल्प संचालक सुभाष साळवे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब गंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेती शाळा सुरू आहेत. या अंतर्गत शेतकऱ्यांना एकात्मिक कीड नियंत्रण, कमी खर्चामध्ये किडीचे नियंत्रण व उत्पादन वाढीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी पीआययू राज्यस्तरीय आयुक्तालयाचे पथक ता. १५ गुरुवारी घाटसावळी येथील शेती शाळेत सहभागी झाले होते.

रेंद्र पाटील यांनी या प्रकल्पांतर्गत मैदा पोखरी व घाटसावळी या गावातून निवड केलेल्या वाणाचे १०० गाठी तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच मंडळ कृषी अधिकारी के. एस. नागरगोजे यांनी गावातील सुरू असलेल्या प्रकल्पाची माहिती दिली. गोरक्षनाथ गटाचे अध्यक्ष राधाकिसन फड यांनी घेण्यात आलेल्या शेती शाळेबाबत व प्रकल्पाविषयी माहिती पथकास दिली.

कृषी विज्ञान केंद्र, खामगावचे शास्त्रज्ञ बी. बी. गायकवाड यांनी कापूस पिकावरील फवारणीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी कृषी पर्यवेक्षक डी. बी. जांभळकर, डी. बी. पवार, डी. डी. खामकर, के. बी. शिंदे, कृषी सहायक पी. एस. नाळपे, ए. एम. कुलकर्णी, जुबेर पठाण, अशोक काळे, श्री. मस्के, शेतकरी अर्जुन कदम, महादेव लांडे, भागवत लांडे, तात्या लांडे, बाबासाहेब जाधव, प्रकाश लांडे, सिद्धांत खवताड, शिवाजी कदम, वैजनाथ लांडे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com