पाण्यासाठी नगरसेवकांचे मुक्काम आंदोलन

aunrangabad
aunrangabad

औरंगाबाद - शहरातील सिडको-हडको भागाचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीसाठी भाजप नगरसेवकांनी नागरिकांसह सिडको एन- सात येथील पाणीपुरवठा कार्यालयासमोर मुक्काम आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार नाही, तोपर्यंत कार्यालयासमोरून हलनार नाही, असा इशारा देत प्रशासनाची विनंती धुडकावून लावण्यात आली.

शहरातील पाणीप्रश्न गेल्या काही महिन्यापासून विस्कळीत झाला आहे. त्यात आता शिवसेना-भाजपा युतीचे राजकारण घुसले असून, पुंडलिकनगर येथील पाण्याच्या टाकीवरून सिडको एन-3, एन-4 भागाला पाणी देण्यास शिवसेनेसह नागरिकांनी विरोध करीत काम बंद पाडले. त्यामुळे भाजप नगरसेवकांनी एक्सप्रेस पाईपलाईनवरील बायपासचा विषय समोर आणला आहे. एक्सप्रेस पाईपलाईनला अनेक भागात बायपास करून पाणी वळवण्यात आल्यामुळेच सिडको-हडकोचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे तब्बल पाच सहा दिवसांनंतर सिडको-हडको भागात पाणी मिळत आहे.  दूषित पाण्याच्या समस्या, नव्या पाईपलाईनची कामे होत नाही, असा आरोप करत मंगळवारपासुन (ता.नऊ) मुक्काम आंदोलन सुरू केले आहे. नगरसेवक नितीन चित्ते, पुष्पा रोजतकर, माजी नगरसेवक माळवदकर यांच्यासह शेकडो नागरिक आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदोलन मागे घेण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com