नियम मोडणाऱ्यांचे सक्तीने कौन्सिलिंग 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

औरंगाबाद - शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात येणार आहेत. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने, लवकरच नियम मोडणाऱ्यांसाठी चार कौन्सिलिंग सेंटर सुरू करण्याचा मानस असल्याची माहिती प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली. 

औरंगाबाद - शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात येणार आहेत. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने, लवकरच नियम मोडणाऱ्यांसाठी चार कौन्सिलिंग सेंटर सुरू करण्याचा मानस असल्याची माहिती प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली. 

औरंगाबाद शहराची वाहतूक व्यवस्था अत्यंत बिघडलेली आहे. शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनांची संख्याही प्रचंड वाढत आहेत. प्रत्येक वर्षी साधारण जिल्ह्यात एक लाख; तर शहरात साठ हजारांपेक्षा अधिक वाहनांची भर पडत आहे. रिक्षाचालक, दुचाकीचालक वाहतुकीची शिस्त मोडण्यात अग्रेसर आहेत. वाहतूक व्यवस्था हाताळण्यासाठी शहरात चार विभाग आहेत. सहायक पोलिस आयुक्तांसह चार पोलिस निरीक्षक कार्यरत आहेत. असे असतानाही वाहतुकीला वळण लागत नाही, ही गंभीर बाब लक्षात घेऊन वाहतूक नियम मोडणाऱ्याचे सक्तीने कौन्सिलिंग करण्यात येणार आहे. यासाठी विभागनिहाय चार कौन्सिलिंग सेंटर सुरू करण्याचा मानस प्रभारी पोलिस आयुक्तांनी एका कार्यक्रम प्रसंगी बोलून दाखविला. वेळ वाचविण्याच्या प्रयत्नात वाहतूक सिग्नल तोडून पळणाऱ्यांना गरजेनुसार किमान तास दोन तास कौन्सिलिंग सेंटरमध्ये बसविले जाईल. या ठिकाणी त्या व्यक्तीला सक्तीने वाहतूक नियम आणि परिणाम समजावून सांगितले जातील. त्याला व्हिडिओ फिल्मद्वारे विदारक अपघात व त्यात झालेल्या नुकसानीची जाणीव करून दिली जाणार आहे. वेळ वाचविण्याच्या प्रयत्नात वाहतूक नियम मोडणाऱ्याचा सक्तीने वेळ खर्ची झाला पाहिजे, अशापद्धतीची शिक्षा असेल असे भारंबे यांनी सांगितले. या शिवाय वाहतूक मोडणाऱ्या प्रत्येकावर पोलिस लक्ष ठेवू शकत नाहीत. त्यामुळे एक वाहतूक ॲप्स तयार करण्यात येत आहे. या ॲप्सवर कुणीही नियम मोडणाऱ्यांचे फोटो टाकू शकणार आहे. ॲप्सवरून आलेल्या फोटोच्या माध्यमाने वाहनधारकांचा शोध घेऊन वाहतूक पोलिस संबंधित वाहनांच्या विरोधात कारवाई करणार आहेत.

Web Title: counseling for those who break the rules