मतमोजणी प्रतिनिधीचा खर्च उमेदवारांच्याच खात्यात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

लातूर - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निकालाकडे आता लक्ष लागले आहे. मतमोजणीसाठी कोण कोणत्या कार्यकर्त्यांना पाठवायचे याच्या याद्याही उमेदवारांकडून तयार केल्या जात आहेत; पण मतमोजणीसाठी कार्यकर्त्यांवर होणारा खर्चही उमेदवारांना दाखवावा लागणार आहे. त्यामुळे मतमोजणीसाठी जास्त कार्यकर्ते नेणे उमेदवारांसाठी अडचणीचे ठरणार आहे. 

जिल्हा परिषदेच्या 58, तर दहा पंचायत समितीच्या 116 जागांसाठी निवडणूक झाली आहे. या निवडणुकीची गुरुवारी (ता. 23) मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक उमेदवार आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांची नियुक्ती करतो. या कार्यकर्त्यांसाठी केल्या जाणाऱ्या गाड्या, त्याचे चहापाण्यावरचा येणारा खर्च, तसेच गरज भासली तर त्याच्या जेवणावरही खर्च केला जातो. हा सर्व खर्च उमेदवारांना निवडणूक विभागाला दाखवावा लागणार आहे. एकूणच निवडणुकीचा खर्च दाखविण्यासाठी निकाल लागल्यानंतर एक महिन्याचा कालावधी आहे; पण त्यात मतमोजणीचा खर्चही ग्रहीत धरला जाणार आहे. त्यामुळे मतमोजणीच्या ठिकाणी कार्यकर्ते पाठविण्यावर मर्यादा येणार आहेत. त्यामुळे आता उमेदवार किती कार्यकर्त्यांना मतमोजणीसाठी पाठवतात याकडे लक्ष लागले आहे. 

""मतमोजणीच्या वेळी उमेदवारांना आपले प्रतिनिधी पाठवता येतात; पण या प्रतिनिधीवर निकाल जाहीर होईपर्यंत जेवढा खर्च केला जाईल तेवढा खर्च उमेदवारांना आपल्या खर्चात दाखवावा लागणार आहे. या खर्चावर निवडणूक विभागाचे लक्ष असणार आहे.'' 
डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषद निवडणूक विभाग 

Web Title: Counting the cost of representative candidates account