देश अदृष्य शत्रुशी लढतो आहे- प्रा. मनोज बोरगावकर

फोटो
फोटो
Updated on

नांदेड : आपला देश, शासन, राज्यसरकार प्राणपणाने लढतात दिसत आहे. पक्षीय मतभेद विसरून सगळेच प्राणपणाने लढताहेत. डॉक्टर, मेडिकल स्टाफ, मीडिया, आणि माझा पोलिस प्राणपणाने जणू सीमेवरच्या सैनिकागत जीवाची बाजी लावून लढतोय. सीमेवर जसे कळत नाहीं गोळी कुठून येऊन छाताडात घुसणार आहे...तरीपण लढाई चालू आहे अव्याहत.... 

सीमेवरच्या सैनिकाचा नशिबी शहीदी तरी नशिब होते... पण या साऱ्यांचा नशिबी आलाच तर एक चुकार व्हायरस येणार तरी बिचारे प्राणपणाने लढताहेत... त्यामुळे त्यांच्या पुढे नतमस्तक होताना पाठीचा कणा आधिकाच ताठ झाल्याचा मनस्वी अनुभव येतोय. असे ठाममत जेष्ठ साहित्यीक तथा नदीष्ठचे लेखक प्रा. मनोज बोरगावकर यांनी ‘सकाळ’शी बोलतांना व्यक्त केले. 

सैनिकाना घरात राहून सहकार्य करायचे

आपण सारे मिळून त्यांचा जीवावर उदार होण्याचा बाण्याला प्राणातून सहकार्य करू या... गम्मत म्हणून बाहेर फेरफटका मारणे... अन् अनिवार्यपणे ड्युटीवर जाणे यात खुप अंतर आहे. हे भान आपण ठेवलेच पाहिजे. ब्लेसिंग इन डीसगाईस म्हणून काही गोष्टीकडेही पाहता येईल. देशातले प्रदूषण प्रचंड कमी झाले आहे. धर्म, जात, पंथ, भाषा विसरून लोक एकदिलाने लढताहेत....घासातला घास काढून देताहेत...
आपल्याला फक्त शासनाला यात तमाम लढणाऱ्या जीवावर उदार झालेल्या सैनिकाना घरात राहून सहकार्य करायचे...मान्य आहे... दिवसचे दिवस घरात बसुन राहणे अवघड आहे.. पण दोस्तहो मेडिकल स्टाफ, पोलिस, मीडिया कर्मी यांच्यापेक्षा खुप सोपी लढाई आपल्याला लढायची आहे..

ही खुपचं विचित्र लढाई आहे शस्त्र घेऊन लढायचे नाही

आपण सगळे मिळून देश राखू या... काय बिशाद आहे आपण एकजुटीने करोनाशी लढलो तर... त्याला पराभूत करायला वेळ नाहीच लागणार. जरासे बेताल वागून आधीच बेताल असणाऱ्या कोरोनाचा बाजूने या लढाईत आपल्याला उभे राहायचे का आख्या देशाच्या बाजूने हे निकराने ठरवायची वेळ आली आहे...
ही खुपचं विचित्र लढाई आहे शस्त्र घेऊन लढायचे नाही ... तर शस्त्र मॅन करून ही लढाई लढावी लागणार आहे...

कोरोना..ला पुसून टाकायचे हे ठरवायची वेळ

हा कॉमन मॅन खूप शहाणा आहे हे त्यांने वेळोवेळी दाखवून दिलंय... पुन्हा ते शहाणपण दाखवायची वेळ आली आहे.... जगाच्या नकाशावरुन आपण पुसल्या जायचे... का ..कोरोना..ला पुसून टाकायचे हे ठरवायची वेळ आता आलीय. सामुहिक शहाणपण दाखवून या अदृश्य शत्रूला पराभुत करू या...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmers Launch Water Protest In Kaygaon As Road Remains Encroached One Year After Written Assurance From Authorities
Unknown Young Man Found Dead In Godavari River Near Kaygaon Body Kept At Gangapur Hospital For Identification
Parbhani SIR
Shirur Kasar Loan Waiver
Marathi News Esakal
www.esakal.com