अपत्य नसल्यामुळे दांपत्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जून 2019

विष घेऊन पती-पत्नीने आत्महत्या केल्याची घटना आडगाव लिसाना (ता. पूर्णा) शिवारात रविवारी (ता. दोन) सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली. अपत्य नसल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

पूर्णा - विष घेऊन पती-पत्नीने आत्महत्या केल्याची घटना आडगाव लिसाना (ता. पूर्णा) शिवारात रविवारी (ता. दोन) सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली. अपत्य नसल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

रमेश दत्तात्रेय काचेकर (वय ५५) व पत्नी रेखाबाई रमेश काचेकर (वय ५०)  हे दांपत्य रिसाला बाजार (जि. हिंगोली) येथे मजुरी करून उदरनिर्वाह करीत होते. अपत्यप्राप्तीसाठी त्यांनी औषधोपचारावर मोठा खर्च केला होता. तरीही यश न आल्याने हे दांपत्य नैराश्‍यात होते. 

देवदर्शनाच्या निमित्ताने ते नेहमी कोणत्या ना कोणत्या गावी जात असत. नैराश्‍यातून रमेश व रेखाबाई काचेकर यांनी पूर्णा-नांदेड रोडवरील धनगर टाकळी फाट्याजवळील आडगाव शिवारात विष घेऊन आत्महत्या केली. मृताचे भाऊ सुरेश काचेकर यांनी चुडावा पोलिसांत दिलेल्या महितीवरून घटनेची नोंद झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The couples suicide because of no offspring Poison