esakal | न्यायालयात हजर राहण्याचे आमदार सुरेश धस यांना आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

10suresh_dhas_40mlc_2

आमदार सुरेश धस यांच्यावर दाखल झालेल्या जिल्हा बंदीच्या गुन्ह्यात धस यांना वॉरंट बजावण्यात आले आहे. गुरुवारी (ता.२२) धस यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

न्यायालयात हजर राहण्याचे आमदार सुरेश धस यांना आदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आष्टी (जि.बीड) : भिगवण व खेड परिसरातून ऊसतोडणी मजुरांची सुटका केल्याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात आमदार सुरेश धस यांच्यावर दाखल झालेल्या जिल्हा बंदीच्या गुन्ह्यात धस यांना वॉरंट बजावण्यात आले आहे. गुरुवारी (ता.२२) धस यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोनाच्या काळात साखर कारखान्यांचा हंगाम संपल्याने गावी निघालेल्या आष्टी, पाटोदा, नवगण राजुरी व बीड येथील मजुरांना एक एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी भिगवण व खेड येथील तपासणी नाक्यावर पोलिसांनी अडविले होते. हाल झाल्याने मजुरांनी आमदार सुरेश धस यांना आपबिती सांगितली. त्यामुळे त्यांनी रात्री या तपासणी नाक्यावर जाऊन मजुरांची खाण्यापिण्याची व्यवस्था केली.

Breaking : दहा लाखांची लाच घेताना वैद्यनाथ बँकेचा अध्यक्ष अशोक जैन जाळ्यात

त्यानंतर संबंधित साखर कारखाना प्रशासनास जाब विचारून ऊसतोड मजुरांना गावाकडे मार्गस्थ केले होते. या प्रकरणी आमदार धस यांच्यावर आष्टी पोलिसांत जिल्हाबंदीचा भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. सध्या राज्यातील ऊसतोडणी मजूर, मुकादम व वाहतुकदारांनी संप पुकारला असून आमदार धस हे ऊसतोड मजूर जनजागृतीसाठी राज्यभर फिरत आहेत. त्यांचा हा दौरा सुरू असताना न्यायालयाने वॉरंट बजावल्याने धस यांना दौरा सोडून २२ सप्टेबर रोजी न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.

संपादन - गणेश पिटेकर