चक्क शेतातील धुऱ्यावरून चुलत भावाचा खून, कुठे ते वाचा...  

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 April 2020

देगलूर तालुक्यातील नरंगल येथे रविवारी (ता.१९) सकाळी शेतातील धुऱ्याच्या कारणावरून चुलत भावाचा खून केल्याची घटना घडली आहे. यामध्ये चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला असून चारही आरोपी ताब्यात घेतले आहे. 

देगलूर ः शेतातील धुऱ्यावरून झालेल्या भांडणात चुलत भावाचा कुऱ्हाडीने घाव घालून खून करण्यात आल्याची घटना रविवारी (ता.१९) सकाळी नरंगल येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून चार आरोपी ताब्यात घेतले आहेत. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे नरंगल येथील हणमंलू इरन्ना कर्णे व गंगाध इरन्ना कर्णे या दोन चुलत भावात शेतातील धुऱ्यावरून गेल्या काही दिवसांपासून भांडण होते. 

वादाचे रुपांतर हाणामारीत 
रविवारी (ता. १९) रोजी गावालगत असलेल्या शेतात घेऊन गेलेल्या गंगाधर ईरन्ना कणें वय ४५ ( बु.) यांच्यासोबत हणमंलू ईरन्ना कर्णे, गंगाधर ईरन्ना कर्णे, गंगाबाई ईरन्ना कर्णे यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली. त्यानंतर गंगाधर ईरन्ना कर्णे यांच्यावर कुऱ्हाडीने घाव घालण्यात आल्याने तो रक्तबंबाळ होऊन जागेवरच पडुन होता. त्यानंतर त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी हनुमलू कर्णे, गंगाधर कर्णे, गंगाबाई कर्णे, रेखा कर्णे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. रविवारी सकाळी झालेल्या घटनेने नरंगल परिसरात खळबळ उडाली असून काही वर्षांपूर्वी मांडगी येथे घडलेल्या हत्याकांडाची व या घटनेने पुन्हा आठवणी ताज्या झाल्या. उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भगवानराव धबडगे हे तपास करीत आहेत.

हेही वाचा -  टपोऱ्या गारांमुळे उभ्या पिकांचे नुकसान, कुठे ते वाचा...

औषधी दुकान, कृषी केंद्र गोदामाला आग, तब्बल चाळीस लाखांचे नुकसान   
अर्धापूर : शहरातील बसवेश्वर चौकातील औषधी दुकानाला व कृषी केंद्राच्या गोदामाला शनिवारी (ता.१८) रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत औषधी दुकानातील १५ लाखांची औषधी जळून राख झाली तर याच दुकानाला लागून असलेल्या कृषी केंद्राच्या गोदामातील २५ लाखांचे खते, किटकनाशके जळून गेली. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक जळित घटना म्हणून नोंद झाली. ही आग शाॅर्टसर्कीटमुळे लागल्याची माहिती फिर्यादीने दिली. 

हेही वाचा - Video ः मुख्यालयी राहण्याची तंबी, मात्र जिवाची घेईना कोणी हमी

आग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांचे प्रयत्न  
अर्धापूरातील बसवेश्वर चौकात संजीवन नावाचे औषधी दुकान आहे. या दुकानाला शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत दुकानातील विविध प्रकारांची औषधे, गोळ्या, फर्निचर व नऊ हजार असे मिळून १५ लाखांचे नुकसान झाले तर याच वेळी या दुकानाला लागून शैलेश कृषी केंद्राच्या गोदामाला आग लागल्याने दुकानातील किटक नाशके, औषधे, सुक्ष्म अन्नद्रव्य आदी साहित्य जळाले. आग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. घटनेबाबत शंकर कोठेकर व शैलेश सोमाणी यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्मिक जळित म्हणून नोंद झाली. तपास जमादार बाबासाहेब चौदंते करित आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cousin murdered by smoke in a field, read where nanded news