Corona Updates: दिलासादायक! मराठवाड्यातील रुग्णसंख्येत मोठी घट

गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असून दिलासा मिळत आहे
covid 19
covid 19covid 19

औरंगाबाद: मराठवाड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत (covid 19 cases) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घट होत असून दिलासा मिळत आहे. रविवारी (ता. ६) दिवसभरात ७४२ रुग्ण आढळले. जिल्हानिहाय वाढलेले रुग्णांमध्ये बीड १८१, औरंगाबाद १३९, नांदेड १०७, उस्मानाबाद १०६, लातूर १०४, जालना ५२, परभणी ४१, हिंगोली १२ जणांचा समावेश आहे. उपचारादरम्यान आणखी ३५ जणांचा कोरोनाने बळी घेतला. त्यात लातूरमध्ये १५, औरंगाबाद ११, बीड ५, जालना २, परभणी, उस्मानाबादेतील एकाचा समावेश आहे.

औरंगाबादेत १३९ बाधित-
औरंगाबाद जिल्ह्यात १३९ कोरोनाबाधितांची भर पडली. त्यात शहरातील ४०, ग्रामीण भागातील ९९ रुग्ण आहेत. रुग्णांची संख्या १ लाख ४३ हजार ८०३ झाली. आणखी २९५ रुग्ण बरे झाले. त्यात शहरातील ९८, ग्रामीण भागातील १९७ जण आहेत. आजपर्यंत १ लाख ३८ हजार १३३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २ हजार ४०० जणांवर उपचार सुरू आहेत.

covid 19
PHOTOS: महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी तुळजाभवानी देवीचे मंदिर

औरंगाबाद जिल्ह्यात आणखी ११ जणांचा मृत्यू झाला. कांचनवाडीतील पुरुष (वय ६६), वैजापूर येथील महिला (६४), रांजणगाव येथील पुरुष (३७), वैजापूर येथील महिला (६८), कन्नड येथील पुरुष (५७), कन्नड येथील पुरुष (६१), ताडेगाव (जि. औरंगाबाद) येथील पुरुष (५०), गंगापूर येथील पुरुष (६५), सटाना (ता. वैजापूर) येथील महिलेचा (७५) घाटी रुग्णालयत तर तिघांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्ह्यात आजपर्यंत ३ हजार २७० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com