esakal | मराठवाड्यात रुग्णसंख्येत घट; प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19

मराठवाड्यात रुग्णसंख्येत घट; काळजी घेण्याचे आवाहन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: मराठवाड्यात बुधवारी (ता. २६) दिवसभरात २ हजार १६४ कोरोनाबाधित आढळले. यामध्ये बीड ७०३, औरंगाबाद ३१८, उस्मानाबाद ३०६, लातूर २५०, जालना २१२, नांदेड २१२, परभणी १३०, हिंगोलीत ३३ रुग्णांचे निदान झाले. मराठवाड्यात उपचारादरम्यान आणखी ७५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यात लातुरमध्ये २०, औरंगाबाद १७, बीड ११, हिंगोली ७, जालना-परभणी-नांदेड- उस्मानाबादमधील प्रत्येकी ५ जणांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यांत आणखी १७ जणांचा मृत्यू झाला. घाटीत १२, जिल्हा रुग्णालयात एक तर खासगी रुग्णालयातील ४ जणांचा समावेश आहे. सिल्लोड येथील पुरुष (वय २९), सातारा परिसरातील पुरुष (७७), व्यंकटेश कॉलनीतील महिला (५६), शहाशुक्ता कॉलनीतील महिला (३२), कन्नडमधील महिला (४५), गंगापूर येथील पुरुष (४१), हर्सूल येथील महिला (६०),पडेगावातील पुरुष (५५), वांजरगाव (वैजापूर) येथील पुरुष (६५), धोंदलगाव येथील महिला (५०), वजनापूर (ता.गंगापूर) येथील महिला (६५), मयुरपार्क, मारोतीनगरातील महिला (८८), केकट जळगाव (ता. पैठण) येथील महिला (६०), गव्हाली (ता. कन्नड) येथील पुरुष (३३), शिवराई बनशेंद्रा (ता. कन्नड) येथील महिला (६५), मिलकॉर्नर भागातील पुरुष (४६), हिरण्यनगरातील (गारखेडा) पुरुषाचा (७३) घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. झाली. आजपर्यंत एकूण ३ हजार१२३ जणांचा मृत्यू झाला.

हेही वाचा: पर्यटकांचे आकर्षण ठरतोय नळदुर्गचा भुईकोट किल्ला; पहा फोटो

औरंगाबादेत ३१८ रुग्णांची भर, ४४२ बरे-
औरंगाबाद जिल्ह्यात ३१८ रुग्णांची भर पडली. त्यात शहरातील ९९, ग्रामीण भागातील २१९ जण आहेत. रुग्णांची संख्या १ लाख ४१ हजार ४५१ वर पोचली आहे. बरे झालेल्या आणखी ४४२ जणांना सुटी देण्यात आली. यात शहरातील २००, ग्रामीण भागातील २४२ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत १ लाख ३३ हजार ४५७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ४ हजार ८७१ जणांवर उपचार सुरू आहेत.