covid 19
covid 19covid 19

'भानावर या; तिसऱ्या लाटेचे संकट टाळा' जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जिल्हाधिकारी जगताप; कठोर निर्बंधापेक्षा शिस्तबद्ध राहण्याचे आवाहन

बीड: कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा (covid 19 second wave in beed) परिणाम जिल्ह्याने पाहिलाच आहे. जनता भानावर राहीली तरच तिसऱ्या लाटेचे (corona third wave) संकट टळेल. कोरोना संसर्गाचा अटकाव करण्यासाठी कठोर निर्बंधापेक्षा लोकांनीच शिस्तबद्ध राहावे आणि निर्बंध टाळावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी केले.

मागच्या दहा दिवसांत जिल्ह्यात अनेकवेळा कोरोनाचा पॉझिटिव्ह रेट पाच ते साडेसहा टक्क्यांपर्यंत वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. २१) जिल्हाधिकारी श्री. जगताप यांनी आवाहन केले. श्री. जगताप म्हणाले, आगामी काळात किती बंधने राहतील हे लोकांच्या वागण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे दिलेल्या शिथिलतेचा योग्य उपयोग केला तरच संभाव्य संकट सौम्य असेल. लोकांनी तपासण्यासाठी स्वत:हून पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले.

covid 19
Sero Survey: बीडमध्ये पाचशे लोकांचे घेतले रक्तनमुने, ICMR ची तपासणी

तिसरी लाट बालकांसाठी धोक्याची असल्याने कुटुंबीयांची काळजी म्हणून समोर भेटणारा प्रत्येकजण कोविड पॉझिटिव्ह समजून अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. आजूबाजूचे रुग्ण आणि मृत्यूंच्या घटना पाहून बोध घेतला नाही तर दुर्दैव ठरेल, असेही श्री. जगताप म्हणाले. दुसऱ्या लाटेत १३ हजार ही सर्वोच्च अॅक्टीव्ह रुग्णसंख्या होती. तिसऱ्या लाटेत हा आकडा तिप्पट होण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे अंदाज आहेत. त्यामुळे खाटा, ऑक्सिजन खाटा, व्हेंटीलेटर्स यांची मोठी उपलब्धता करावी लागणार आहे. लोकांनी गांभीर्याने वागावे, असे आवाहन त्यांनी केले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com