उस्मानाबाद जिल्ह्याला दिलासा, आज २१ जणांना कोरोनाची लागण

तानाजी जाधवर
Friday, 27 November 2020

उस्मानाबाद   जिल्ह्यामध्ये शुक्रवारी (ता.२७) २१ जणांना कोरोनाची लागण झाली असून तेवढेच रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

उस्मानाबाद  : जिल्ह्यामध्ये शुक्रवारी (ता.२७) २१ जणांना कोरोनाची लागण झाली असून तेवढेच रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज मृत्युची नोंद झालेली नाही. विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये जिल्ह्यामध्ये मृत्यू होण्याची कमालीची घट झाल्याने निश्चितपणे दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यामध्ये आजपर्यंत १४ हजार ७७९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२९ टक्के इतके झाले असुन जिल्ह्यात शुक्रवारीही २१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत जिल्ह्यातील ९६ हजार ८८८ इतक्या संशयितांची तपासण्या करण्यात आल्या.

त्यातील १५ हजार ६७४ इतक्या रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना होण्याचे प्रमाण १६.१८ टक्के एवढे आहे. जिल्ह्यातील १२९ जणाचे स्वॅब चाचणी घेण्यात आली होती. त्यातील ११ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३६६ संशयितांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्यातील दहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्ह्याचा विचार केला तर उस्मानाबाद सहा, कळंब सात, परंडा पाच, लोहारा, तुळजापुर व वाशी प्रत्येकी एक जण बाधित झाले आहेत. भूम व उमरगा तालुक्यामध्ये एकाही रुग्णांची नोंद नाही.

उस्मानाबाद कोरोना मीटर
एकुण रुग्णसंख्या - १५६७४
बरे झालेले रुग्ण - १४७७९
उपचाराखालील रुग्ण- ३३०
एकुण मृत्यु - ५६५
आजचे बाधित - २१
आजचे मृत्यु - ००

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 21 Cases Recorded In Osmanabad District