esakal | Jalna Corona Update : जालना जिल्ह्यात ३० नवीन कोरोना रुग्ण, दोघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

3coronavirus_23

जालना  जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत ३१३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १२ हजार २०४ कोरोनाबाधित रूग्ण आतापर्यंत निष्पन्न झाले आहे

Jalna Corona Update : जालना जिल्ह्यात ३० नवीन कोरोना रुग्ण, दोघांचा मृत्यू

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत ३१३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १२ हजार २०४ कोरोनाबाधित रूग्ण आतापर्यंत निष्पन्न झाले आहे. त्यापैकी ११ हजार ५६९ रूग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सध्या ३२२ कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांचे मृत्यू सुरूच आहेत. शुक्रवारी (ता.२७) दोन कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत ३१३ जणांना कोरोनामुळे बळी गेला आहे. आज ३० नवीन कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे.

यामध्ये जालना शहरातील आठ, तालुक्यातील भनग जळगाव, पांगरवाडी, गोंदेगाव, बोन्सी तांडा येथील प्रत्येकी एक, मंठा तालुक्यातील शिवनगिरी व वझर सरकटे येथील प्रत्येकी एक, घनसावंगी शहरातील एक, अंबड शहरातील चार, बादनापूर तालुक्यातील अकोला, मांडवा, काजळा व कंडारी बु. येथील प्रत्येकी एक, जाफराबाद शहरातील एक, भोकरदन शहरातील एक व इतर बुलडाणा जिल्ह्यात पाच जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्हा आला आहे. त्यामुळे आतापर्यंत आतापर्यंत १२ हजार २०४ कोरोनाग्रस्त रूग्ण निष्पन्न झाले आहेत. दरम्यान २७ जण उपचाराअंती कोरोनामुक्त झाल्याने आतापर्यंत कोरोनामुक्त रूग्णांची संख्या ही ११ हजार ५६९ वर जाऊन पोचली आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात ३२२ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत.

पंधरा जण अलगीकरणात
जिल्ह्यातील पंधरा जणांना शुक्रवारी अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामध्ये अंबड येथील शासकीय मुलींचे वसतिगृहात १४ तर घनसावंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात एक जणास अलगीकरणात ठेवले आहे.


संपादन - गणेश पिटेकर

loading image