
बीड जिल्ह्यात मंगळवारी (ता. २२) नवीन ३३ रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या १६ हजार ५०५ झाली.
बीड : जिल्ह्यात मंगळवारी (ता. २२) नवीन ३३ रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या १६ हजार ५०५ झाली. पण, नवीन मृत्यूची नोंद नाही. मंगळवारी ५५२ लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ५१९ चाचण्यांचे अहवाल निगेटीव्ह तर ३३ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. या नवीन ३३ रुग्णांसह जिल्ह्याची रुग्णसंख्या आता १६ हजार ५०५ झाली.
आतापर्यंत १५ हजार ६४९ रुग्ण योग्य उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्हाभरात केवळ ३३० रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्हा रुग्णालय, अंबाजोगाईचे स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयासह काही शासकीय आरोग्य संस्था व खासगी रुग्णालयांत कोरोना उपचार सुरु आहेत. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील ५२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी नवीन मृत्यूची नोंद नाही.
Edited - Ganesh Pitekar