
जालना जिल्ह्यात कोरोनाबधितांची भर सुरूच आहे. त्यातच रविवारी (ता.सहा ) ३८ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली.
जालना : जिल्ह्यात कोरोनाबधितांची भर सुरूच आहे. त्यातच रविवारी (ता.सहा ) ३८ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली. तर सात जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सध्या ४२७ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ६०६ कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये रविवारी (ता.सहा) ३८ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले.
यात जालना शहरात १९ नवीन रूग्ण निष्पन्न झाले. तर तालुक्यातील खानेपुरी येथे पुन्हा चार रूग्ण मिळून आले आहेत. तिरूपती प्लाझा येथील तीन, गोंधनगाव येथील दोन, गोलापांगरी येथील एक, घनसावंगी शहरातील एक, तालुक्यातील आंतरवाली येथील एक, अंबड शहरातील एक, बदनापूर तालुक्यातील खाडेगाव येथे एक, जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील एक, भोकरदन शहरातील एक व बुलडाणा जिल्ह्यातील तीन जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. तर रविवारी सात कोरोनाबधीत रूग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली आहे. परिणामी आतापर्यंत ११ हजार ८५५ कोरोनाग्रस्त रुग्णांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात ४२७ कोरोनाग्रस्त रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत ३२४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
Edited - Ganesh Pitekar
----------------------
जिल्ह्याची कोरोना रुग्ण आकडेवारी
एकूण कोरोनाबाधित ः १२ हजार ६०६
एकूण कोरोनामुक्त ः ११ हजार ८५५
एकूण मृत्यू ः ३२४
उपचार सुरू ः ४२७
..................