Corona Update: जालन्यात कोरोना मीटर पुन्हा वाढू लागले, ३९ जणांना कोरोनाची लागण

उमेश वाघमारे
Friday, 18 December 2020

जालना शहरातील कोरोना मीटर पुन्हा वाढू लागले आहे. शुक्रवारी (ता.१८) आढळून आलेल्या ३९ कोरोनाबाधित रुग्णांपैकी २२ रूग्ण हे एकट्या जालना शहरातील होती.

जालना : शहरातील कोरोना मीटर पुन्हा वाढू लागले आहे. शुक्रवारी (ता.१८) आढळून आलेल्या ३९ कोरोनाबाधित रुग्णांपैकी २२ रूग्ण हे एकट्या जालना शहरातील होती. दरम्यान दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण कोरोनामुक्त झाले. सध्या जिल्ह्यातील ३१३ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून जालना शहरातील कोरोना मीटर पुन्हा तेजीत फिरू लागले आहे. गत तीन दिवसांमध्ये जालना शहरात ५२ कोरोनाबाधित रूग्ण निष्पन्न झाले होते.

 

 

शुक्रवारी  पुन्हा यात २२ कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे गत चार दिवसांमध्ये शहरात ७४ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर तालुक्यातील पिरपिंपळगाव, वजार येथील प्रत्येकी एक, परतूर तालुक्यातील आकणी येथील एक,अंबड शहरातील एक, अंबड तालुक्यातील जामखेड येथील पाच, शहापूर येथील एक, जाफराबाद शहरातील एक, तालुक्यातील विरखेडा भालके येथील एक व इतर बुलडाणा येथील तीन व परभणी एक कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

परिणामी आतापर्यंत १२ हजार ८२५ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर जिल्ह्यात शुक्रवारी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत ३३७ जणांचे कोरोनामुळे बळी गेले आहेत. दरम्यान दोन कोरोनाबाधित रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात १२ हजार २१४ जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यात ३१३ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत.

 

 

जिल्ह्यातील कोरोना रुग्ण आकडेवारी
एकूण कोरोनाबाधित ः १२ हजार ८६४
एकूण कोरोनामुक्त ः १२ हजार २१४
एकूण मृत्यू ः ३३७
उपचार सुरू ः ३१३
 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 39 Cases Reported In Jalna, Two Died Jalna News