उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ५१ नवीन कोरोना रुग्णाची भर

तानाजी जाधवर
Wednesday, 4 November 2020

उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये बुधवारी (ता.चार) ५१ नवीन कोरोना रुग्णाची भर पडली.

उस्मानाबाद  : जिल्ह्यामध्ये बुधवारी (ता.चार) ५१ नवीन कोरोना रुग्णाची भर पडली.दिवसभरामध्ये मृत्यु झाल्याची नोंद नाही. शिवाय २७ रुग्णांना उपचारानंतर बरे करुन घरी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बरे होण्याचे प्रमाण अत्यंत चांगल्या प्रकारे वाढत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत १३ हजार ७७२ इतके रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. त्याचे प्रमाण पाहिल्यास ९२.४७ टक्के इतके पाहायला मिळत आहे. जिल्ह्यामध्ये मृत्युचा दर ३.६१ टक्के इतका असुन त्याचाही आकडा वाढलेला दिसून येत आहे.

बीडमध्ये उद्या मराठा आरक्षण युवा व विद्यार्थी परिषद; विनायक मेटे, सर्जेराव निमसेंची उपस्थिती

नवीन आलेल्या रुग्णामध्ये २४ जण आरटीपीसीआरद्वारे तर २४ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर इतर तीन जणांना परजिल्ह्यामध्ये लागण झाल्याची नोंद आहे. यामध्ये १३० जणांचे स्वॅब चाचणी घेऊन प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आली होती. त्यामध्ये २४ जण बाधित झाले आहेत. ३७८ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली आहे. त्यातील २४ रुग्णाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

उस्मानाबादमध्ये १२, तुळजापुर पाच, उमरगा तीन, लोहारा दोन, कळंब दहा, वाशी नऊ, भूम पाच, परंडा पाच अशी तालुकानिहाय वाढलेल्या रुग्णांची संख्या आहे. जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातील रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये व जिल्ह्याबाहेरील मागील काही दिवसांत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची पोर्टलवर नोंद उशीरा होत आहे. ती अद्ययावत होत असल्यामुळे त्याची नोंद दररोजच्या क्रियाशील रुग्णामध्ये घेत असल्याने दररोजच्या रुग्णसंख्येत प्रत्यक्ष त्या दिवशी पॉझिटिव्हपेक्षा अधिक असल्याचे दिसून येत आहे.

बीडमध्ये निराधारांची दिवाळी होणार गोड!

उस्मानाबाद कोरोना मीटर
एकुण रुग्णसंख्या - १४८९३
बरे झालेले रुग्ण- १३७७२
उपचाराखालील रुग्ण- ५८३
एकुण मृत्यु - ५३८
आजचे बाधित - ५१
आजचे मृत्यु - ००

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 51 New Cases Recorded In Osmanabad District