esakal | बीडमध्ये निराधारांची दिवाळी होणार गोड!
sakal

बोलून बातमी शोधा

निराधार.jpg

लाभार्थींच्या खात्यात सात कोटी जमा, आमदार क्षीरसागर यांचे प्रयत्न 

बीडमध्ये निराधारांची दिवाळी होणार गोड!

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : शासनाच्या संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, इंदिरा गांधी योजनेतील लाभार्थ्यांची बारमाही निवडीसाठी व मानधनासाठी होणारी फरफट थांबली आहे. बीड तालुक्यातील निराधारांची यंदाची दिवाळीही गोड होणार असून वरील योजनांतील लाभार्थींच्या खात्यावर सात कोटी रुपयांचे मानधन जमा झाल्याची माहिती संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब डावकर व शहराध्यक्ष अशफाक इनामदार यांनी दिली. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

समिती नसल्याने मागच्या पाच महिन्यांपासून विविध योजनांतील लाभार्थींचे मानधन रखडले होते. दरम्यान, महिनाभरापूर्वी श्री. डावकर व श्री. इनामदार यांच्या आमदार संदीप क्षीरसागर यांच्या शिफारशीवरून समित्यांवर निवडी झाल्या. त्यानंतर पात्र लाभार्थींच्या निवडी वेगाने झाल्या. आता लाभार्थींचे पाच महिन्यांचे थकलेले मानधनही त्यांच्या खात्यावर पडल्याने त्यांची दिवाळी गोड होणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यामध्ये संजय गांधी योजनेतील लाभार्थींसाठी दोन कोटी ४८ लाख रुपये, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थींसाठी एक कोटी ९३ लाख, इंदिरा गांधी योजनेतील दोन कोटी ८२ लाख अनुदान रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या सूचनेनंतर या कामासाठी तहसीलदार सुशांत शिंदे, नायब तहसीलदार अभय जोशी, नायब तहसीलदार श्रीमती कुटे व संबंधित कर्मचाऱ्यांनीही पुढाकार घेतल्याचे भाऊसाहेब डावकर व अशफाक इनामदार यांनी सांगितले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(Edited By Pratap Awachar)