esakal | बीडमध्ये उद्या मराठा आरक्षण युवा व विद्यार्थी परिषद; विनायक मेटे, सर्जेराव निमसेंची उपस्थिती
sakal

बोलून बातमी शोधा

Maratha Reservation Yuva Vidyarthi Parishad In Beed

मराठा आरक्षणासह समाजाच्या न्याय हक्कांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारला जाग यावी. तसेच विद्यार्थी-युवकांना आरक्षणाच्या क्लिष्ट प्रक्रियेची कायदेशीर माहिती व्हावी, यासाठी गुरुवारी (ता.पाच) शहरात मराठा आरक्षण युवक व विद्यार्थी परिषद होत आहे.

बीडमध्ये उद्या मराठा आरक्षण युवा व विद्यार्थी परिषद; विनायक मेटे, सर्जेराव निमसेंची उपस्थिती

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : मराठा आरक्षणासह समाजाच्या न्याय हक्कांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारला जाग यावी. तसेच विद्यार्थी-युवकांना आरक्षणाच्या क्लिष्ट प्रक्रियेची कायदेशीर माहिती व्हावी, यासाठी गुरुवारी (ता.पाच) शहरात मराठा आरक्षण युवक व विद्यार्थी परिषद होत आहे. ‘आम्ही परिषदेला येत आहोत, तुम्हीही या’ असा नारा आयोजकांनी दिला आहे. परिषदेसाठी विविध विद्यार्थी व युवक संघटनांनी पुढाकार घेतला आहे.

मराठा आरक्षणासाठी ७ नोव्हेंबरला मातोश्रीवर मशाल मोर्चा! 

सकाळी साडेअकरा वाजता कॅनॉल रोडवरील सूर्या लॉन्स येथे होणाऱ्या परिषदेत शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे, माजी कुलगुरु तथा गायकवाड आयोगाचे माजी सदस्य सर्जेराव निमसे, सर्वोच्च न्यायालयातील विधिज्ञ ॲड.श्रीराम पिंगळे व अॅड.अमोल करांडे मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेला श्री क्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी महाराज, इंगळे महाराज, लक्ष्मण महाराज मेंगडे, लक्ष्मण महाराज रामगडकर, नाना महाराज यांच्यासह शिवसंग्रामचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन धांडे, भारतीय संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तथा सनदी लेखापाल बी. बी. जाधव यांची उपस्थिती असेल.

ओबीसी-मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, मराठा महासंघाचा इशारा

परिषदेसाठी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे, अशोक सुखवसे, राहुल टेकाळे, मुकुंद गोरे, ॲड. शशिकांत सावंत, ॲड. योगेश शेळके, ॲड. गणेश मस्के, ॲड. योगेश टेकाडे, सोमनाथ मोटे, अजय शिंदे, महारुद्र जाधव आदी युवक व विद्यार्थी संघटनांच्या पदधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. परिषदेला मराठा समाजातील विद्यार्थी-युवकांनी उपस्थित राहण्यासाठी जिल्हाभरात विविध ठिकाणी बैठकांतून जनजागृती केली जात आहे. ‘परिषदेला आम्ही येणार आहोत, तुम्हीही या’ हे घोषवाक्य तयार करण्यात आले आहे. परिषदेला उपस्थितीचे आवाहन बिभीषण कदम, ओंकार घुमरे, ओंकार पाटील, जयसिंह काकडे, वैभव प्रभाळे,  निलेश चाळक, शशिकांत दातार, कैलास नाईकवाडे, भागवत नाईकवाडे, राहुल टेकाळे, राजेंद्र आमटे,  हरिश शिंदे, शैलेश सुरवसे, प्रेम धायजे, बालाजी गुंदेकर, अजय काकडे, श्रीराम येवले, अक्षय शिंदे आदींनी केले.

संपादन - गणेश पिटेकर