उस्मानाबाद जिल्ह्यात ५६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

तानाजी जाधवर
Thursday, 29 October 2020

उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये गुरूवारी (ता.२९) ५६ नवीन रुग्णांची भर पडली असून १२५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये गुरूवारी (ता.२९) ५६ नवीन रुग्णांची भर पडली असून १२५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. दिवसभरात एकही मृत्यु झालेला नाही. तरीही मृत्युदर अजूनही साडेतीन टक्क्यांच्या पुढे गेल्याचे दिसून येत आहे. इतर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्याबाहेर झालेल्या आठ मृत्यूंची नोंद आजच्या तारखेत करण्यात आली. एका टक्क्याने बरे होण्याचे प्रमाण घटल्याचे चित्र आहे.

दोघा भावांच्या मेहनतीला आले फळ, अतिपावसातही बहरली अद्रक शेती

आतापर्यंत जिल्ह्यातील १३ हजार २८६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील १२८ संशयितांचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यातील १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ४७३ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. त्यातील ३० जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. परजिल्ह्यामध्ये १२ जण बाधित झाल्याची नोंद आहे. उस्मानाबाद १७, तुळजापुर सहा, उमरगा पाच, लोहारा शुन्य, कळंब आठ, वाशी सात, भूम सात, परंडा सहा अशी तालुकानिहाय वाढलेल्या रुग्णांची संख्या दिसुन येत आहे.

उस्मानाबाद कोरोना मीटर
एकुण रुग्णसंख्या - १४६३५
बरे झालेले रुग्ण- १३२८६
उपचाराखालील रुग्ण- ८३२
एकुण मृत्यु - ५१७
आजचे बाधित - ५५
आजचे मृत्यु - शून्य

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid New 56 Cases Recorded In Osmanabad District