उस्मानाबाद जिल्ह्यात ६६ नवीन कोरोना रुग्ण, सहा जणांचा मृत्यू

तानाजी जाधवर
Thursday, 15 October 2020

जिल्ह्यामध्ये गुरुवारी (ता.१५) ६६ नवीन रुग्णांची भर पडली असून सहा जणांचा मृत्यु झाला. एका दिवसात १०२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार २०७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये गुरुवारी (ता.१५) ६६ नवीन रुग्णांची भर पडली असून सहा जणांचा मृत्यु झाला. एका दिवसात १०२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार २०७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.३० टक्के एवढे झाले आहे. जिल्ह्यात मृत्यूचा दर सव्वा तीन टक्के झाला आहे.

उद्धव ठाकरेंनी फक्त बांद्राचे मुख्यमंत्री न राहता महाराष्ट्राचा विचार करावा, भाजपचे माजी मंत्री निलंगेकरांचा सल्ला

कोरोनाबाधिताचा आकडा कमी होत असला तरी मृत्युदर मात्र कमी झालेला नाही.जिल्ह्यामध्ये आलेल्या ६६ नवीन रुग्णांपैकी ३१ जण आरटीपीसीआरद्वारे व ३२ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. १५९ जणाचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील ३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. २६६ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या. त्यातील ३२ जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील १९ जण बाधित आहेत, तर तुळजापुर तालुक्यातील १८ जणांचा समावेश आहे. या शिवाय कळंब तालुक्यात १५ जणांना लागण झाली असुन इतर तालुक्यामध्ये रुग्णांचा एकेरी आकडा आहे.

उमरगा, लोहारा तालुक्यातील ४२ तलाव 'ओव्हरफ्लो'

सहा जणांचा मृत्यु
वाशी तालुक्यातील पिंपळगावच्या ८० वर्षीय पुरुष, परंडा तालुक्यातील अनाळा येथील ८० वर्षीय पुरुष, वाशी तालुक्यातील भिमनगर येथील ६७ वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील गौर येथील ७० वर्षीय पुरुष, उस्मानाबाद तालुक्यातील समुद्रवाणी येथील ६५ वर्षीय पुरुष, उस्मानाबाद तालुक्यातील विजोरा येथील ६५ वर्षीय पुरुष आदी सहा जणांचा जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.

उस्मानाबाद कोरोना मीटर
एकुण रुग्णसंख्या - १३६७०
बरे झालेले रुग्ण- १२२०७
उपचाराखालील रुग्ण- १०९९
एकुण मृत्यु - ४४४
आजचे बाधित - ६६
आजचे मृत्यु - ०६

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Positive 66 Cases Reported In Osmanabad District