उमरगा, लोहारा तालुक्यातील ४२ तलाव 'ओव्हरफ्लो'

अविनाश काळे 
Thursday, 15 October 2020

अतिवृष्टीने तलावात मुबलक पाणीसाठा

उमरगा (उस्मानाबाद) :  उमरगा, लोहारा तालुक्यात मंगळवारी ( ता. १३ ) रात्री झालेल्या अतिवृष्टीने ४५ तलाव पूर्णपणे भरले आहेत.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मागच्या पंधरा दिवसापूर्वी झालेल्या पावसाने उमरगा - लोहारा  तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अठरा तलाव शंभर टक्के भरले होते. परतीच्या पावसाचा कहर शेतीच्या नुकसानीला कारणीभूत ठरला मात्र पाणी साठ्यात मोठी वाढ झाली, त्यामुळे येणाऱ्या काळात ओलिताखालील क्षेत्र वाढू शकते शिवाय पाणीटंचाईचा प्रश्नही मिटणार आहे. उमरगा - लोहारा तालुक्यातील ४५ प्रकल्पापैकी उमरगा तालुक्यातील ३१ आणि लोहारा तालुक्यातील सर्वच अकरा प्रकल्प तुडुंब भरले आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

उमरगा तालुक्यातील भरलेले तलाव पुढीलप्रमाणे : साठवण तलाव- नारंगवाडी, कोराळ, सुपतगाव, दाळींब, एकूरगा, बलसूर क्रमांक एक, बलसूर क्रमांक दोन, वागदरी, भिकार सांगवी, केसरजवळगा क्रमांक एक, केसरजवळगा क्रमांक दोन, भूसणी, कदेर, गुंजोटीवाडी, मूरळी, तलमोडवाडी, डिग्गी, रामनगर. सरोडी (८० टक्के), गुंजोटी (७४), कसगी (७९). लघू पाटबंधारे तलाव- पेठसांगवी, काळनिंबाळा, कोरेगाव, कोरेगाववाडी, आलूर. मध्यम प्रकल्प - जकापूर, बेन्नीतूरा, तूरोरी. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

लोहारा तालुक्यातील भरलेले तलाव पुढीलप्रमाणे : साठवण तलाव - अचलेर, धानुरी, बेलवाडी, भोसगा, जेवळी क्रमांक एक, जेवळी क्रमांक दोन, माळेगाव, हिप्परगा रवा. लघू पाटबंधारे तलाव- अचलेर, धानुरी, हिप्परगा रवा.दरम्यान ४५ पैकी ४२ तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलाव परिसरातील व तलावातून विसर्ग होणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने शेतीसह पिके वाहून गेली आहेत मात्र येणाऱ्या काळात पाणी साठ्याचा उपयोग शेतीसह, विविध गावाच्या पाणीपुरवठा योजनांसाठी उपयूक्त ठरणार आहे.

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Umarga and Lohara taluka 42 lakes overflow