
बीड : कोरोना संसर्गाच्या काळात अव्वाच्या सव्वा दराने खरेदी, कामे अपूर्ण असतानाच ठेकेदाराला देयके अदा करणे, तांत्रिक मान्यतेविना खरेदी, अनावश्यक खरेदीच्या माध्यमातून उधळपट्टी केल्याच्या प्रकरणात आरोग्य विभागातील १२ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू झाली आहे.