CoronaUpdate : उस्मानाबाद जिल्ह्यात २१ रुग्णांची भर

तानाजी जाधवर
Friday, 4 December 2020

उस्मानाबाद  जिल्ह्यात २१ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, ३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सुदैवाने शुक्रवारी (ता. चार) एकाही मृत्यूची नोंद नसल्याने काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यात २१ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, ३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सुदैवाने शुक्रवारी (ता. चार) एकाही मृत्यूची नोंद नसल्याने काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०७ टक्के इतके आहे. तर मृत्यूदर ३.४९ टक्क्यावर गेला आहे.शुक्रवारी आढळलेल्या २१ रुग्णांपैकी उस्मानाबादमध्ये सात, वाशी तालुक्यात पाच व लोहारा तालुक्यात पाच रुग्णांची संख्या दिसून येत आहे.

भूम तालुक्यात दोन तसेच कळंब व परंडा तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तुळजापूर व उमरगा तालुक्यात सुदैवाने एकाही रुग्णांची नोंद नाही. जिल्ह्याबाहेर आढळलेल्या तीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील १२१ जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली. त्यातील १३ जणांना कोरोनाची लागण झाली तर २५९ संशयिताची अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्यातील पाच जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

उस्मानाबाद कोरोना मीटर
एकूण रुग्णसंख्या ः १५,८५६
बरे झालेले रुग्ण ः १५,०७५
उपचाराखालील रुग्ण ः २२८
एकूण मृत्यू ः ५५३

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covide 21 Cases Recorded In Osmanabad District