मराठवाड्यातील शेतकरी, शेतमजूर एकवटले

अनिलकुमार जमधडे
मंगळवार, 17 एप्रिल 2018

औरंगाबाद : भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे शेतकरी-शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी (ता. 17) क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. 

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी द्यावी, पीक विम्याची नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना अखंडित वीज, मनरेगा मजुरांना किमान पाचशे रुपये वेतन, भूमिहीनांना जमीन देण्यात यावी, पानसरे, दाभोलकरांचे खुनी पकडण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला.

भर उन्हामध्ये क्रांतीचौक, पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौक मार्गे मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. भाकपच्या वतीने सर्व विभागनिहाय मोर्चे काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार विदर्भ, उत्तर महाराष्ट्र त्यापाठोपाठ मराठवाड्याचा हा मोर्चा काढण्यात आला होता.

मोर्चामध्ये भाकपचे राष्ट्रीय सदस्य डॉ. भालचंद्र कांनगो, राज्य सचिव तुकाराम भस्मे, शेतमजूर युनियनचे राज्य अध्यक्ष ऍड. मनोहर टाकसाळ, प्रा. डॉ. राम बाहेती, अश्‍फाक सलामी, अभय टाकसाळ, भास्कर लहाने, प्रकाश बनसोडे यांच्यासह मराठवाड्यातील कार्यकर्ते तसेच शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, असंघटीत क्षेत्रातील कामगार कर्मचारी सहभागी झाले होते.

Web Title: CPI organises Farmers protests in Marathwada