औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयात पाळणा हलला 

योगेश पायघन
रविवार, 9 डिसेंबर 2018

औरंगाबाद : दोन वर्षांपासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटी) अखेर शनिवारी (ता.आठ) सायंकाळी पहिला पाळणा हलला. एक-एक करून सुरू झालेल्या या रुग्णालयातील प्रत्येक विभागाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

औरंगाबाद : दोन वर्षांपासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटी) अखेर शनिवारी (ता.आठ) सायंकाळी पहिला पाळणा हलला. एक-एक करून सुरू झालेल्या या रुग्णालयातील प्रत्येक विभागाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

जालना जिल्ह्यातील महिलेची पहिली आणि नैसर्गिक प्रसूती शनिवारी झाली. जन्माला आलेल्या गोंडस मुलाची प्रकृती ठणठणीत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी म्हणाले. सुरवातच चांगली झाल्याने मिनी घाटीच्या स्त्रीरोग विभागाचा विश्‍वास दुणावल्याची भावना येथील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. 

गेवराई बाजार (ता. बदनापूर) येथील गंगासागर परमेश्‍वर भालसिंग या महिलेला प्रसूतीसाठी शनिवारी दाखल करण्यात आले होते. त्या महिलेची प्रसूती रात्री आठच्या सुमारास झाली. डॉ. तृप्ती सानप यांनी ही प्रसूती केली. मंगळवारी (ता. चार) स्त्रीरोग विभागाच्या दालनाची फीत कापून अनौपचारिकरीत्या प्रसूती विभाग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर प्रसूतीसाठी महिला दाखल झाल्या; मात्र पहिला पाळणा हलवण्याचा मान गंगासागर भालसिंग यांना मिळाला. 

आरोग्यमंत्री देणार सोमवारी भेट 
''आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा सोमवारी (ता. दहा) नियोजित दौरा आहे. त्यावेळी ते मिनी घाटीला भेट देऊन प्रसूत महिलेची भेट घेतील, असे डॉ. कुलकर्णी म्हणाले. आता मिनी घाटीत केवळ अपघात विभाग सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. त्यालाही लवकरच मुहूर्त लागण्याची शक्‍यता आहे.

Web Title: The cradle is made in Aurangabad district hospital