मंत्री धनंजय मुंडेंसोबत फिरणाऱ्या क्वारंटाईन काँग्रेस जिल्हाध्यक्षावर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 May 2020

बीड जिल्ह्यात अखेर कोरोनाने धडक मारलीच. शनिवार (ता.१६) पहिले दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पुढचे दोन दिवसही जिल्ह्याला कोरोनाचे मोठे धक्के बसले. आतापर्यंत बीड शहरासह पाच तालुक्यांत कोरोनाने एंट्री केली असून, कोरोनाग्रस्त आढळलेले सर्वच रुग्ण मुंबईहून परतलेले आहेत. 

अंबाजोगाई (जि. बीड) - होम क्वारंटाइनच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्यावर मंगळवारी (ता.१९) शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

राजकिशोर मोदी हे पक्षाच्या आदेशावरून विधान परिषदेची उमेदवारी दाखल करण्यासाठी मुंबईला गेले होते. तेथून ते १२ मे रोजी अंबाजोगाईत परतले. त्या दिवसापासून ते होम क्वारंटाइन होते; परंतु १६ मे रोजी ते पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत मांगवडगावच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी उपस्थित होते, अशी तक्रार होती.

दरम्यान, दरम्यान, प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा आदर्श पॅटर्न निर्माण करून कोरोनाला वेशीवरच अडविलेल्या बीड जिल्ह्यात अखेर कोरोनाने धडक मारलीच. शनिवार (ता.१६) पहिले दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पुढचे दोन दिवसही जिल्ह्याला कोरोनाचे मोठे धक्के बसले. आतापर्यंत बीड शहरासह पाच तालुक्यांत कोरोनाने एंट्री केली असून, कोरोनाग्रस्त आढळलेले सर्वच रुग्ण मुंबईहून परतलेले आहेत. 

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

जिल्ह्याच्या नावे १९ कोरोनाग्रस्तांची आजघडीला नोंद आहे. यापूर्वीही आष्टी तालुक्यातील पिंपळा (ता.आष्टी) येथे ता. नऊ एप्रिलला उशिरा आढळला होता. मात्र, त्याची तपासणी व उपचार नगरलाच झाल्याने त्याची नोंदही तिकडेच झाली. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्तच होता; मात्र शासनाने बाहेर जिल्ह्यात, राज्यात अडकलेल्या विद्यार्थी, कामगार, नोकरदार यांना गावी परतण्याचे धोरण निश्चित केले. सुरवातीला ऊसतोड कामगार परतले. नंतर, मुंबई, पुणे, औरंगाबादसह परराज्यात अडकलेले कोणी परवानगीने तर कोणी छुप्या मार्गाने जिल्ह्यात येऊ लागले आणि जिल्ह्याचे कोरोनामीटर वाढतच गेले. 

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

ऊसतोड कामगार सुरक्षित, मुंबईमुळे लागण 
सात हजारांवर ऊसतोड कामगारांनी जिल्ह्यात प्रवेश केल्याची अधिकृत नोंद आहे. तीन आठवड्यांपासून मजूर प्रवेश करत आहेत. मात्र, त्यांच्यातील अद्याप एकही कोरोनाग्रस्त आढळला नाही. मात्र, मागच्या तीन दिवसांत आढळलेले १९ कोरोनाग्रस्त हे मुंबई, ठाणे येथूनच परतलेले आहेत. विशेष म्हणजे यातील काही छुप्या मार्गानेच जिल्ह्यात आलेले आहेत. 
बीडसह पाच तालुक्यांत रुग्ण 
यापूर्वी इटकूर (ता. गेवराई) येथील १२ वर्षीय मुलीला व हिवरा (ता. माजलगाव) येथील तरुणाला कोरोना आढळला. पुन्हा मोठा धक्का बसला तो सांगवी पाटण येथे नातेवाइकांकडे मुंबईहून आलेल्या व नगर जिल्ह्यातील पिंपळगाव हुडा येथील एकाच कुटुंबातील सात जणांना कोरोना असल्याचे समोर आल्यानंतर. त्यानंतर पुन्हा कवडगाव थडी (ता. माजलगाव) येथील दोघांना कोरोना असल्याचे समोर आले. तर, मंगळवारी (ता. १९) उशिरा बीड शहरातील पाच जणांसह केज तालुक्यातील केळगाव व चंदनसावरगाव येथील दोघे आणि इटकूर (ता. गेवराई) येथील कोरोनाग्रस्त मुलीच्या आईलाही कोरोची लागण झाल्याचे समोर आले. अशा प्रकाराने कोरोनाने पाच तालुक्यांत धडक मारली. 

हेही वाचा - युरोपात जर्मनीनेच रोखला मृत्युदर, सर्वाधिक चाचण्या, वेळेत उपचार

सध्या १२ रुग्णांवर उपचार सुरू 
चार दिवसांत १९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असले तरी यातील एका वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, सहाजण पुढील उपचारासाठी पुण्याला रवाना झाले. त्यामुळे आता जिल्हा रुग्णालयात १२ जणांवर उपचार सुरू आहेत. 
११४ अहवालांची प्रतीक्षा; बीड, माजलगावचे सर्वाधिक 
दरम्यान, बुधवारी ११४ स्वॅब पाठविले आहेत. यामध्ये सर्वाधिक ४३ माजलगाव तालुक्यातील तर बीडमधून ३९ स्वॅबचा समावेश आहे. आष्टी तालुक्यातूनही १६ स्वॅब पाठविले असून, अंबाजोगाई, परळी, गेवराई व केजहूनही स्वॅब घेतलेले आहेत. त्याचे अहवाल उशिरा येणार आहेत.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime against Quarantine Congress District President walking with Minister Dhananjay Munde