पोलिस पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

औरंगाबाद - ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यरत पोलिस नाईक परवीन मोईज बेग यांनी रविवारी (ता. १८) आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिस पतीसह सातजणांविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. २१) गुन्ह्याची नोंद झाली. 

मोईज नसीब बेग, नसीब हसन बेग, रईस नसीब बेग, अनिस नसीब बेग यांच्यासह सातजणांवर गुन्हा नोंद झाला. परवीन बेग या पोलिस महिलेने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी (ता. १९) सकाळी छायाचित्रणासह शवविच्छेदन झाले. यानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यरत मोईज बेग व त्याच्या कुटुंबीयांच्या छळाला कंटाळून परवीन बेग यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. 

यानंतर परवीन बेग यांचे वडील व निवृत्त सहायक फौजदार शेख बदियोद्दीन मशरोद्दीन यांच्यासह नातेवाइकांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेतली होती. आपली मुलगी परवीन यांचा बेग कुटुंबीयांनी छळ केला. यामुळेच परवीन यांनी आत्महत्या केल्याचे निवेदन त्यांनी दिले. तिच्या मृत्यूला जबाबदार असणारांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी त्यांनी केली. पण शवविच्छेदन अहवालात गळफासामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले.

त्यानुसार, शेख बदियोद्दीन शेख मशरोद्दीन यांच्या तक्रारीनुसार सातजणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद झाली.

Web Title: crime in aurangabad