हिंगोली - कळमनुरीत वरिष्ठ लिपीकासह नगराध्यक्षावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

हिंगोली : कळमनुरी येथील नगरपालिकेत एका नगरसेविकेला अश्लील भाषेत बोलून विनयभंग केल्याच्या आरोपावरून वरिष्ठ लिपिका सह नगराध्‍यक्षा वर सोमवारी (ता. 30) रात्री कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हिंगोली : कळमनुरी येथील नगरपालिकेत एका नगरसेविकेला अश्लील भाषेत बोलून विनयभंग केल्याच्या आरोपावरून वरिष्ठ लिपिका सह नगराध्‍यक्षा वर सोमवारी (ता. 30) रात्री कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कळमनुरी नगरपालिकेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये चांगलेच रणकंदन झाले आहे. यामध्ये नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला. यामध्ये सत्ताधारी व विरोधकांमध्ये एकमेकांवर चिखलफेक अहि करण्यात आली. त्यामुळे पालिकेची सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर एका नगरसेविकेने तहकुब सभेचे इतिवृत्त द्यावे अशी मागणी केली. यावेळी पालिकेचे वरिष्ठ लिपिक देवराव बोलके याने इतिवृत्ताची झेरॉक्स काढून देतो असे म्हणून त्यांना कार्यालयीन अधीक्षक यांच्या कक्षा समोरील मोकळ्या जागेत बोलवले, त्यानंतर त्यांना अश्लील भाषेत बोलून त्यांचा विनयभंग केला.

यामध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे यांनी चिथावणी दिल्याचा आरोप नगरसेविकेने दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. यावरून कळमनुरी पोलिसांनी पालिकेचे वरिष्ठ लिपिक देवराव बोलके, नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक राहूल मदने पुढील तपास करीत आहेत.

Web Title: crime filed against senior clerk and municipal council head in kalmanuri hingoli