Marathwada Crime : बोलेरो पिकअप आणि सोन्याचे लॉकेटसाठी सासरी छळ, कंटाळून विवाहितेची आत्महत्या

अंबाजोगाई तालुक्यातील घटना; चौघांविरुद्ध बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
crime married woman suicide in Ambajogai case file against husband other family relatives beed
crime married woman suicide in Ambajogai case file against husband other family relatives beedsakal

अंबाजोगाई : बोलेरो पिकअप आणि सोन्याचे लॉकेट घेण्यासाठी माहेरातून तीन लाख रुपये घेऊन ये अशी मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेचा सतत छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने लग्नानंतर वर्षभराच्या आतच गळफास घेऊन आत्महत्या केली. तालुक्यातील साळुंकवाडी येथे शनिवारी (ता.१३) ही घटना घडली. पतीसह चौघांविरुद्ध बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेघा निखिल करवे असे मृत विवाहितेचे नाव आहे. मेघाचे वडील भरत खज्जे (रा. औसा, जि. लातूर) यांच्या तक्रारीनुसार, मेघाचे लग्न मागील वर्षी निखिल गंगाधर करवे (रा. साळुंकवाडी, ता. अंबाजोगाई) याच्याशी झाले होते. सुरुवातीचे दोन महिने चांगले गेल्यानंतर पती निखिल, सासू वर्षा, सासरा गंगाधर नरहरी करवे, दीर आदित्य ऊर्फ भैय्या यांनी विविध कारणांनी छळ सुरु केला.

crime married woman suicide in Ambajogai case file against husband other family relatives beed
Crime News : शेतकऱ्यांच्या वेषात गेले अन् फरारीला घेऊन आले!

मेघाच्या आई-वडिलांनी समजूत घालूनही त्यांच्या वागण्यात फरक पडला नाही. त्यानंतर बोलेरो पिकअप आणि सोन्याचे लॉकेट घेण्यासाठी माहेरातून तीन लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत त्या चौघांनी मेघाचा छळ सुरू केला. शनिवारी (ता.१३) निखिलने मेघाच्या वडिलांना बोलावून घेतले. यावेळी मेघाने हुंड्यासाठी मारहाण होत असल्याचे वडिलांना सांगितले.

crime married woman suicide in Ambajogai case file against husband other family relatives beed
Pune Crime : चोरीच्या गुन्ह्यात अटक; विश्रामबाग पोलिस ठाण्यातील लॉकअपमध्ये संपवले जीवन

पैसे देण्यास असमर्थता दाखवल्यानंतर मेघाला यापुढे कधीच माहेरी पाठवणार नसल्याचे निखिलने सांगितल्याने तिचे वडील तिथून निघून आले. त्यानंतर ता.१३ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास मेघाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पती निखिल, सासू वर्षा, सासरा गंगाधर नरहरी करवे, दीर आदित्य गंगाधर करवे यांच्याविरुद्ध बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com