नांदेड महापालिकेच्या उपायुक्तांविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

नांदेड - अपंगाचे प्रमाणपत्र सादर करून उपायुक्त पदापर्यंत पदोन्नती मिळवून आर्थिक लाभ घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी स्वेच्छानिवृत्तीच्या तयारीत असलेले महापालिकेचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. न्यायालयाच्या आदेशावरून वजिराबाद पोलिस ठाण्यात मंगळवारी ही कारवाई झाली. सहायक आयुक्त प्रकाश येवले यांनी याबाबत तक्रार दिली होती.

महापालिकेतील उपायुक्त रत्नाकर कांतराव वाघमारे (कुक्कडगावकर) यांनी 50 टक्के अपंग असल्याचे प्रमाणपत्र सादर करून तत्कालीन नगरपालिकेत 30 डिसेंबर 1987 ला वरिष्ठ लिपिकपदी पदोन्नती मिळवली. त्यानंतर 17 जुलै 1992 ला "लिपिक' ऐवजी "अव्वल कारकून' अशी दुरुस्ती करून घेतली. अव्वल कारकून पदावरुन ते लेखापाल झाले. रत्नाकर वाघमारे यांच्यापेक्षा सात दिवसांनी सेवाज्येष्ठ असतानाही पदोन्नतीपासून डावलण्यात आल्याचे प्रकाश येवले यांचे म्हणणे होते. सेवाज्येष्ठता नसतानाही 17 फेब्रुवारी 2006 रोजी वाघमारे उपायुक्तपदी विराजमान झाले. तेव्हापासून आजपर्यंत ते महापालिकेत याच पदावर आहेत.

Web Title: crime on nanded muniipal deputy commissioner

टॅग्स