esakal | बीड जिल्ह्यात जुन्या भांडणाच्या कारणावरून भरदिवसा गोळीबार
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

बीड जिल्ह्यात जुन्या भांडणाच्या कारणावरून भरदिवसा गोळीबार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गेवराई (बीड): जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर भरदुपारी गोळीबार करण्यात आला. मात्र, संबंधित तरुणाने सतर्कता दाखविल्याने तो बचावला. ही घटना शुक्रवारी (ता.१६) दुपारी तीनच्या सुमारास तालुक्यातील मादळमोही येथे घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. याप्रकरणी दोघांविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

मादळमोही येथील पवन गावडे या तरुणाचे महामार्गालगत घर व तेथेच बांधकाम साहित्याचे दुकान आहे. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास या दुकानासमोर गावडे थांबले असता याठिकाणी दोन तरुण दुचाकीने आले. यानंतर जुन्या भांडणातून नोंद असलेला गुन्हा परत घे म्हणून गावडे यांच्याशी हुज्जत घालत त्याच्या डोक्याला एकाने पिस्तूल लावून गोळी झाडली. यावेळी गावडे यांनी सतर्कता दाखविल्याने गोळी डोक्याला चाटून गेली.

हेही वाचा: चिंताजनक! बीडमध्ये तपासण्या घटूनही कोरोना रुग्ण पावणेदोनशे पार

हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला. याप्रकरणी गावडे यांच्या तक्रारीवरून संजय पवार व अविनाश पवार या दोघांविरोधात गुन्हा नोंद झाला. तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप काळे करीत आहेत.

loading image