Crime News : सीईटी परीक्षेत कमी गुण मिळण्याच्या भीतीने निकालाआधीच विद्यार्थ्याची आत्महत्या

Suicide
Suicide

हिंगोली : एमएचटी सीईटीचा परीक्षेत कमी गुण मिळाल्यास आई-वडिलांना वाईट वाटेल, या भीतीने हा निकाल सोमवारी ता.१२ दुपारी एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ता.१२ राज्य राखील दल वसाहतीत घडली.

Suicide
School Education : विद्यार्थ्यांना तीन महिन्यांसाठी एकच पुस्तक! दप्तराचे ओझे कमी होणार

प्रविण संजय गायकवाड असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य राखीव दलात संजय हे गायकवाड हे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. राज्य राखीव दलाच्या वसाहतीमधे ते आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांचा मुलगा प्रविण हा यंदा बारावी उत्तीर्ण झाला होता. त्याला ७२ टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर त्याने सीईटीची परिक्षा दिली होती.

दरम्यान,सोमवारी या परिक्षेचा निकाल होता. या परिक्षेत आपल्याला कमी गुण मिळाल्यास आई वडिलांना वाईट वाटेल, या भितीमुळे तो मागील दोन दिवसांपासून अस्वस्थ होता.

Suicide
Raj Thackeray : "ह्यावर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की,..."; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

सोमवारी सकाळी त्याने एका खोलीत गळफास घेतला. त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या खोलीचा दरवाजा वाजवला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी व शेजारील नागरिकांनी दरवाजा तोडून पाहिले असता प्रविण याचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.

या प्रकाराची माहिती हिंगोली शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले, उपनिरीक्षक अशोक कांबळे, जमादार संजय मार्के, पुरी यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी त्याचे वडिल संजय गायकवाड यांनी दिलेल्या माहितीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com