उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

सेलू - "सामना' वर्तमानपत्राच्या उत्सव पुरवणीच्या अंकात मराठा क्रांती मूक मोर्चाचे विडंबन करून व्यंग्यचित्र रेखांकित केल्याप्रकरणी संपादक तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश येथील न्यायदंडाधिकारी एस. आर. शिंदे यांनी बुधवारी (ता.18) दिला.

मराठा क्रांती मूक मोर्चाचे विडंबन केलेले व्यंग्यचित्र रेखाटल्याप्रकरणी सेलू पोलिसांत ऍड. रामेश्वर शेवाळे यांनी 25 सप्टेंबर 2016 रोजी रीतसर तक्रार दाखल केली होती; परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास असमर्थता दाखविल्याने शेवाळे यांनी न्यायालयात धाव घेत खासगी फिर्याद दाखल करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याप्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. फिर्यादीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मराठा समाजातील महिलांचे बदनामीकारक व्यंग्यचित्र रेखाटणाऱ्या "सामना'चे संपादक उद्धव ठाकरे तसेच कार्यकारी संपादक संजय राऊत आणि व्यंग्यचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई या तिघांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला.

"निर्णयाचे स्वागत'
दैनिक "सामना'तील वादग्रस्त व्यंग्यचित्रप्रकरणी न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्याचे स्वागत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे यांनी केले. मराठा समाजाच्या भावनांचा आदर केल्याबद्दल त्यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत.

Web Title: crime on uddhav thackeray